Bajrang Sonawane on Dhananjay Munde : बीडमधलं राजकारण टोकाला; धनंजय मुंडेंना राक्षस, रावण म्हटल्यानंतर आता थेट भुताची उपमा!

Parli Assembly Constituency : परळी विधानसभा मतदारसंघात सध्या राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे
Bajrang Sonawane on Dhananjay Munde
Bajrang Sonawane on Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

Parli Vidhansabha Election 2024 : परळी विधानसभा मतदारसंघात सध्या राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली असून, त्यांना आता चक्क भुताची उपमा दिली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. या निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीने जोर लावला आहे. त्यातच महायुती आणि महाविकास आघाडीचे(MVA) नेतेमंडळी एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

परळी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीकडून कृषी मंत्री धनंजय मुंडे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर त्यांच्याविरोधात शरद पवारांनी(Sharad Pawar) मराठा उमेदवार म्हणून काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदावरील राजेसाहेब देशमुख यांना आपल्या पक्षात घेत उमेदवारी दिली आहे.

Bajrang Sonawane on Dhananjay Munde
Pankaja Munde: पंकजा मुंडेंचे भरसभेत मोठं विधान; म्हणाल्या, 'धनंजय मुंडेंनी कमळच हाती घेतलं असतं तर...

त्यामुळे आतापरळी मतदारसंघात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष परळीतील निवडणुकीकडे लागले आहे. तर काही दिवसआधी प्रचारसभेत बोलताना धनंजय मुंडे यांनी कमळच हाती घेतले असते तर बरे झाले असते, असे वक्तव्य भाजप (Bjp) नेत्या, विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांनी केलं होतं.

बजरंग सोनवणे(Bajrang Sonawane) यांनी परळीतील जनतेला उद्देशून म्हटलं आहे की, परळी विधानसभा मतदारसंघात दादागिरी सुरू आहे. मात्र बजरंग सोनवणे तुमच्यासोबत आहे, तुम्ही घाबरू नका. कुणी तुमच्यावर वाकड्या नजरेने आला तर मी दुसऱ्या मिनिटाला तुमच्याकडे येतो.

Bajrang Sonawane on Dhananjay Munde
Sharmila Thackeray: 'दीड हजार रुपये देऊन, तीन हजार रुपये घेतात' ; शर्मिला ठाकरेंचे महायुती सरकारवर टीकास्त्र!

तर याआधी बजरंग सोनवणेंनी धनंजय मुंडेंना(Dhananjay Munde) राक्षस आणि रावण ही उपमा देखील दिली होती. त्यानंतर त्यांनी आता म्हटले की, तिकडे परळी अंबाजोगाईत बघू काय ते, आम्ही आमच्या केज मतदारसंघात ते भूत येऊ देत नाही. परळी विधानसभेतील अंबाजोगाईत एवढी दादागिरी येऊ दिल नाही. आता आम्हाला ही भीती आहे की हे भूत केज मतदारसंघात कधी शिरतं, त्यामुळे आम्ही तिथून सुद्धा त्याला हद्दपार करून टाकलं आहे आणि आता इथेही तुम्ही हद्दपार करणार.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com