Sharmila Thackeray Thane Rally: एकीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतर्गत महिलांना दीड हजार रुपये देतात. तर, दुसरीकडे विविध वस्तूंवर आकरण्यात येणारा कर आणि दरवाढीच्या रूपात तीन हजार रुपये घेत, असल्याची टीका राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी महायुती सरकारवर केली. मनसेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ठाण्यातील गोकुळ नगर येथे आयोजित सभेत त्या बोलत होत्या.
तसेच, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे दीड हजार रुपये फुकट देण्यापेक्षा शेतकऱ्यांना हमी भाव दया. त्यामुळे त्यांच्या पत्नीना पैसे देण्याची गरजच लागणार नाही. तसेच आज महिला खुश आहेत की त्यांना पंधराशे रुपये मिळाले. पण हे पैसे आपल्या करातून जात असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय 'आपल्या समोर असलेले सर्व पक्ष हे किमान दहा वर्ष सत्तेत होते. सत्ता उपभोगून 75 वर्षानंतर ही सर्वत्र परिस्थिती अत्यंत बिकट आहे. प्रभादेवी सारख्या ठिकाणी दिवाळीच्या दिवशी घरात पाणी नव्हते. मुंबई महापालिकेत 25 वर्षे सत्तेत असलेली शिवसेना (Shivsena) रस्त्यावरील गटारावर झाकण लावू शकत नाही. या पक्षानी तुम्हाला इतक्या वर्षात काय दिले, हा प्रश्नच आहे.' असंही शर्मिला ठाकरेंनी म्हटलं.
याचबरोबर, 'मुंबई-गोवा महामार्गांवर अपघात होऊन अनेक मृत्यू होतात. तो रस्ता बहुतेक मंगळावरचा असेल म्हणून अद्याप पूर्ण होऊ शकला नसल्याची खोचक टीका त्यांनी सरकारवर केली. मुंबई आणि ठाण्यात पोलीस वसाहतीच्या मोठ्या जमिनी आहेत. जर सरकारने मनात आणले तर त्या जमिनीवर पोलिसासाठी उंच इमारती उभ्या राहू शकतात. पण त्याकरिता सरकारच्या इच्छाशक्तीची गरज असल्याचंही शर्मिला ठाकरेंनी (Sharmila Thackeray) सांगितलं.
दरम्यान, कोरोना काळात तेव्हाचे मुख्यमंत्री हे अडीच वर्षांत केवळ दोनदा मंत्रालयात गेले. जेव्हा मैदानात उतरण्याची वेळ होती तेव्हा राजा बंगल्यात बसला होता. असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लागवला.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.