Dr.Bhagwat Karad News : खासदार भागवत कराड यांनी बोराळकर विरोधातील शस्त्र म्यान केले!

Member of Parliament Bhagwat Karad has withdrawn his opposition to Boralakar's appointment as the city president, signaling political reconciliation. : शहराध्यक्ष पदाच्या शर्यतीत कराड यांचे चिरंजीव हर्षवर्धन कराड याचे नाव चर्चेत होते. स्वत: डाॅ. कराड त्यासाठी प्रयत्नशील होते.
Dr.Bhagwat Karad-Shirish Boralkar News
Dr.Bhagwat Karad-Shirish Boralkar NewsSarkarnama
Published on
Updated on

BJP News : शहराध्यक्ष पदाच्या निवडीवरून छत्रपती संभाजीनगरात भाजपामध्ये असलेली गटबाजी उघड झाली. विद्यमान शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्या नावाला खासदार डाॅ. भागवत कराड यांनी विरोध केला आणि नव्या चेहऱ्या संधी दिली पाहिजे, अशी भूमिका मांडली. यावर नाराज झालेल्या बोराळकर यांनी हा विषय प्रतिष्ठेचा केला, त्यानंतर वाद अधिक चिघळू नये म्हणून कराड यांनी बोराळकर विरोधीतील शस्त्र म्यान केले आहे. माझा बोराळकर यांच्या नावाला विरोध नाही, ते शहराध्यक्ष झाले तर मला आनंदच होईल, असा युटर्न कराड यांनी घेतला.

शहराध्यक्ष निवडीत विद्यमान शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्या नावाला माझा विरोध नाही. ते पुन्हा अध्यक्ष झाल्यास आनंदच असेल; परंतु या पदावर नवीन चेहऱ्याला संधी मिळावी, अशी कार्यकर्ते-पदधिकाऱ्यांची भावना आहे. शेवटी भाजपच्या संस्कृतीप्रमाणे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य करावा लागतो, असे खासदार डॉ. भागवत कराड (Dr.Bhagwat Karad) म्हणाले. बोराळकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही युतीतच लोकसभा निवडणूक लढलो. त्यात आमच्या मित्र पक्षातील उमेदवार संदीपान भुमरे यांचा लाखभर मतांनी दणदणीत विजय झाला.

यानंतर त्यांच्याच नेतृत्वात लढलेल्या विधानसभा निवडणुकीत शहरातील पूर्व मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे (BJP) उमेदवार अतुल सावे विजयी झाले. मध्य मतदारसंघात आमचे मित्र पक्षाचे प्रदीप जैस्वाल आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघातही मित्र पक्षाचे संजय शिरसाट हे ही विजयी झाले. यामुळे पक्षासाठी बोराळकरांचे काम नाकारता येत नाही. शहराध्यक्षपदाची निवड होताना नवीन चेहऱ्यांना संधी मिळायला हवी, अशी सर्व पदाधिकारी-कार्यकर्त्यांची भावना आहे.

Dr.Bhagwat Karad-Shirish Boralkar News
Bhagwat Karad On Water Issue : हो.. महापालिकेच्या सत्तेत आम्हीही, पण रिमोट कंट्रोल खैरेंचा म्हणून पाणी प्रश्नाला तेच जबाबदार!

परंतु, अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील. तो आम्हा सर्वांना मान्य असेल. त्यात विद्यमान शहराध्यक्ष बोराळकर यांना पुन्हा संधी मिळाल्यास मला आनंदच असेल, असेही कराड यांनी म्हटले आहे. शहराध्यक्ष पदाच्या शर्यतीत कराड यांचे चिरंजीव हर्षवर्धन कराड याचे नाव चर्चेत होते. स्वत: डाॅ. कराड त्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र वरिष्ठांनी एकाच घरात दोन पदे देण्यास विरोध दर्शवला आणि कराड यांनी बोराळकरांच्या नावाला विरोध करत नव्या चेहऱ्याला संधी देण्याची मागणी केली.

Dr.Bhagwat Karad-Shirish Boralkar News
Dr.Bhagwat karad : फायनान्स मिनिस्टर म्हणून खूप काम केले, मला कॅबिनेटची आशा होती! खासदार कराडांनी व्यक्त केली खंत

डाॅक्टरांच्या या अचानक बोराळकर विरोधामुळे पक्षात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. हा विषय थेट राज्य आणि केंद्रातील भाजपा नेत्यांच्या कानापर्यंत पोहचवण्यात आला. त्यानंतर दिवसभर फोनाफानी सुरु होती. प्रकरण अंगलट येत असल्याचे लक्षात येताच भागवत कराड यांनी बोराळकर यांना असलेला विरोध मागे घेतला. माझा त्यांना विरोध नाही, अशी भूमिका जाहीर करताना देखील पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नव्या चेहऱ्याला संधी द्यावी, अशी इच्छा असल्याचे सांगत गुगली टाकली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com