
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरचे शिवसेना खासदार संदीपान भुमरे यांच्या भावजय, खासगी पीए यांच्या देशी दारू दुकानांना एका दिवसात मंजूरी देण्यात आल्याचे अॅड. सिद्धेश घोडके यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. याप्रकरणात खंडपीठाचे न्यायमूर्ती मंगेश पाटील व न्यायमूर्ती वाय. जी. खोब्राडगे यांनी, विभागीय आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, सरपंच व ग्रामसेवकांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.
पैठण (Paithan) तालुक्यातील फारोळा व गंगापूर तालुक्यातील पांढरओहळ येथे अनधिकृत दारू दुकाने सुरू आहेत. बाजीराव सोनवणे यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली आहे. फारोळा व पांढरओहळ येथे अनधिकृत दारुचे दुकाने सुरू असून पैठणचे तत्कालीन गटविकास अधिकारी, गंगापूरचे तत्कालीन गटविकास अधिकारी यांनी अवैधपणे स्वत:च प्रस्ताव तयार करून एका दिवसात दारू दुकानांना मंजुर करून घेतल्याचे ॲड. सिद्धेश घोडके यांनी याचिकेत म्हटले आहे.
सिद्देश घोडके यांनी न्यायालयाला निदर्शनास आणून दिले की, ग्रामपंचायत, पंचायत समिती तसेच दारूबंदी विभागाने जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल केली आहे. (Aurangabad High Court) गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगापूर यांनी पांढरओहोळ ग्रामपंचायत ठरावासहित मंजुरीसाठी राज्य उत्पादन शुल्क यांच्याकडे 8 डिसेंबर 2023 रोजी दिले. त्याच तारखेला छाया राजू भुमरे यांच्या नावे पांढरओहोळ येथे एम.जे.डिसुझा दुकानाचे स्थलांतर करून नाव बदलून में. सी. आर. या नावाने देशी दारू दुकान सुरू केले आहे.
या सर्व प्रकारात ग्रामपंचायत सदस्यांचा सामावेश असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या प्रकरणात फारोळा (ता. पैठण) ग्रामपंचायतीने ग्रामसभा रद्द केल्याचे कारण सांगून आयत्या वेळेच्या विषयात सागर वाईन शॉप देशी- विदेशी दारूचे दुकान परवान्याचा ठराव मंजूर केला आहे. सदर ठरावात गावकऱ्यांऐवजी दुसऱ्यांच्याच सह्या आढळून आल्या आहेत.
पैठणचे तत्कालीन गटविकास अधिकार्यांनी सदर ठराव वैध ठरवून चौकशी न करताच त्यास मान्यता दिली. या सर्व प्रकारात तत्कालीन पालकमंत्री यांचे वैयक्तिक सहाय्यक सुधाकर काकडे, तसेच ग्रामसेवक व इतरांचा सामावेश असल्याचे ॲड. सिद्धेश घोडके यांनी न्यायालयास सांगितले. सुनावणीनंतर खंडपीठाने संबंधितांना नोटीस बजावल्या आहेत. पुढील सुनावणी 19 ऑगस्ट 2025 रोजी ठेवली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.