Marathwada Railway News
Marathwada Railway NewsSarkarnama

Marathwada Railway News : रेल्वे प्रश्नांना आता वाली कोण ? नवनिर्वाचित खासदारांची बैठकीकडे पाठ

MP Bhumre, Kale was absent from the very first meeting of the railway division : मतदारसंघातील सत्कार समारंभांना आवर्जून जाणारे हे नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी रेल्वे पश्नावर आयोजित बैठकीकडे मात्र फिरकले नाही.
Published on

Nanded Railway News : देशाच्या इतिहासात पहिल्यांदा 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर मराठवाड्याला रेल्वे खात्यासारख्या महत्वाचे राज्यमंत्री पद लाभले होते. लोकसभेच्या जालना मतदारसंघातून सलग पाचव्यांदा निवडून गेलेल्या भाजपच्या रावसाहेब दानवे यांना रेल्वे खात्याचे राज्यमंत्री पद मिळाले होते. ज्या मराठवाड्यातून दानवे निवडून गेले त्या भागाचा रेल्वे विकास गेल्या चार दशकांपासून रखडला होता. राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर रावसाहेब दानवे यांनी मराठवाड्यातील रखडलेल्या रेल्वे मार्गांना वेग दिला.

याशिवाय महाराष्ट्राला कधी नव्हे ते रेल्वे विकास कामांसाठी हजारो कोटींचे बजेट मिळाले. मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचा पराभव झाला आणि मराठवाड्याच्या वाट्याला आलेले राज्य रेल्वेमंत्री पदही. आता पुन्हा रेल्वे विकासकामांच्या बाबतीत उदासीनता दिसू लागली आहे. रावसाहेब दानवे मंत्रीपदावर होते तेव्हा त्यांनी मराठवाड्यातील रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण, विद्युतीकरण, नवीन रेल्वे मार्गांना मंजुरी, मॉडेल रेल्वे स्थानकांच्या कामाला गती, वंदे भारत, जनशताब्दी एक्सप्रेसचा हिंगोली पर्यंत विस्तार, अशी अनेक कामे मार्गी लावली.

मात्र आता त्यांच्या पराभवानंतर पुन्हा रेल्वे विकास कामाबाबत नव्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची उदासीनता दिसून आली आहे. नुकतीच नांदेड विभागात रेल्वे विभागाची बैठक पार पडली. या बैठकीला मराठवाड्यातील सर्व खासदारांना आमंत्रित करण्यात आले होते. परभणीचे संजय जाधव, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर यांनी या बैठकीला हजेरी लावत आपापल्या भागातील प्रश्नांना वाचा फोडली. पण छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे, जालन्याचे डाॅ. कल्याण काळे मात्र गैरहजर होते.

Marathwada Railway News
Khamgaon-Jalna Railway Line : खामगाव-जालना रेल्वे मार्गासाठी 2023-24च्या अर्थसंकल्पातही होती तरतूद !

मतदारसंघातील सत्कार समारंभांना आवर्जून जाणारे हे नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी रेल्वे पश्नावर आयोजित बैठकीकडे मात्र फिरकले नाही. (Kalyan Kale) राज्यसभेतील संभाजीनगरचे खासदार डॉ. भागवत कराड हे ही बैठकीला गेले नाही. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील महायुतीचे ऐकमेव निवडून आलेले खासदार संदीपान भुमरे यांच्यासाठी खरतर ही बैठक महत्वाची होती.

तर ज्या जालना लोकसभा मतदासंघाकडे रावसाहेब दानवे यांच्या रुपाने या खात्याचे मंत्रीपद होते, त्या जालन्याचे विद्यमान खासदार यांनी तर या बैठकीला आवर्जून उपस्थिती लावून मतदारसंघासह मराठवाड्यातील रेल्वे विकासकामाचा आढावा घेणे अपेक्षित होते.मात्र या बैठकीला त्यांची असलेली अनुपस्थिती सर्वांनाच खटकली आहे. मराठवाड्यातील रावसाहेब दानवे यांच्याकडे असलेले रेल्वे राज्यमंत्रीपद लोकसभेतील पराभवानंतर गेले.

Marathwada Railway News
BJP Leader Raosaheb Danve News : मोदी म्हणाले, रावसाहेब दानवेजी का काम रुकना नही चाहिए ; अन् झाले हे मोठे काम

आता मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नांना कोणी वाली राहिला आहे की नाही ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. रेल्वे विभागाच्या अहवालानुसार नांदेड विभागात छत्रपती संभाजीनगरकडून रेल्वेला चांगले उत्पन्न मिळाल्याचे समोर आले आहे. एकीकडे रेल्वे उत्पन्नात वाढ होत असतांना दुसरीकडे मात्र आपल्या विभागात अधिकाधिक रेल्वे विकासाची कामे करून घेण्यात लोकप्रतिनिधी कमी पडत आहेत का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com