Khamgaon-Jalna Railway Line : खामगाव-जालना रेल्वे मार्गासाठी 2023-24च्या अर्थसंकल्पातही होती तरतूद !

Maharashtra Government : वास्तविक खामगाव-जालना रेल्वे मार्गासाठी लागणाऱ्या निधीसाठी राज्य शासनाने मंजुरी दिलेली नाही.
Khamgaon Railway Station
Khamgaon Railway StationSarkarnama
Published on
Updated on

Khamgaon-Jalna Railway Line : 9 मार्च 2023ला तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत सन 2023-24चा अर्थ संकल्प सादर केला होता. या अर्थसंकल्पात त्यांनी खामगाव-जालना रेल्वे मार्गासाठी राज्याच्या वाट्याच्या भरायच्या रकमेची तरतूद केल्याचा आपल्या भाषणात उल्लेख केला होता. खामगाव-जालना रेल्वे मार्गातील राज्याच्या सर्व अडचणी आता दूर झाल्या आहेत, असे त्यावेळी समजण्यात आले होते. पण त्यापुढे काहीही झाले नव्हते.

आता काल (ता. 27) अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली खरी. पण गेल्या वर्षीप्रमाणे याहीवेळेस तसेच होऊ नये म्हणजे झालं, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावेळी त्यांनी खामगाव-जालना रेल्वे मार्गासाठी राज्य शासन 50 टक्के निधी देईल, अशी घोषणा केली. वास्तविक खामगाव-जालना रेल्वे मार्गासाठी लागणाऱ्या निधीसाठी राज्य शासनाने मंजुरी दिलेली नाही. फक्त शब्दांचा खेळ याठिकाणी करण्यात आलेला आहे.

रेल्वे आंदोलन समितीचे सदस्य संतोष लोखंडे यासंदर्भात म्हणाले की, मी रेल्वे लोक आंदोलन समितीच्यावतीने आवाहन करू इच्छितो की, कोणीही जनतेची दिशाभूल करू नये. या मार्गाला राज्य सरकारने अद्याप मंजुरी दिलेली नाही. अशा प्रकारची घोषणा मागच्या वर्षीदेखील करण्यात आली होती. तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी घोषणा केली होती. पण पुढे त्या घोषणेचे काहीही झाले नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Khamgaon Railway Station
Buldhana Forest : रोही, रानडुकराला मारण्यासाठी ‘फॉरेस्ट’ला ठोकले कुलूप

२०१६ च्या पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वातील तब्बल 115 वर्षांपासून प्रलंबित असलेला खामगाव-जालना रेल्वेमार्गाला 2016च्या केंद्रीय अर्थसंकल्पात सर्वेक्षणासाठी मान्यता मिळाली. यासाठी 3000 कोटी रुपयांची तरतूदही केल्याने खामगाव-जालना रेल्वे मार्ग होण्याच्या जिल्हावासीयांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र मागील काळात यातील काहीच झालेलं नाही. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मागच्या वर्षातील अर्थसंकल्पाची स्क्रिप्ट "जशीच्या तशी"च वाचली गेल्याने हा निवडणुकीचा जुमला असल्याच्या प्रतिक्रिया विरोधकांकडून येत आहेत.

खामगाव ते जालना रेल्वेमार्गाच्या आजपर्यंतच्या घडामोडी..

खामगाव ते जालना हा रेल्वे मार्ग 165 किलोमीटरचा असून याचे काम ब्रिटिश काळात सुरू झाले होते. परंतु कालांतराने दुसरे महायुद्ध सुरू झाल्यामुळे याचे काम रखडले. त्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेसच्या कार्यकाळात कायमच या रेल्वे मार्गाच्या कामाला बगल दिली गेली आणि त्यामुळे गेल्या 115 वर्षापासून हा रेल्वे मार्ग प्रलंबित आहे.

सन 2016मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सत्तेत आलेल्या सरकारने केंद्रीय अर्थसंकल्पात सर्वेक्षणासाठी मान्यतेसह 3000 कोटींची तरतूद केली. राज्य सरकारने यामध्ये आपला वाटा भरावा. यासाठी चार मार्च 2020 रोजी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करून या विषयाला सभागृहात वाचा फोडण्यात आली होती.

या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी तांत्रिक टीमकडून पाहणी झाली. परंतु आता इतक्या वर्षानंतर या अर्थसंकल्पात या मार्गासाठी आर्थिक तरतूद केल्या गेल्यामुळे यासाठी पाठपुरावा करणाऱ्या रेल्वे लोक आंदोलन समितीच्या आंदोलनाला यश आले आहे. त्यामुळे आता नक्कीच या रेल्वे मार्गाच्या कामाला गती येईल व मराठवाडा व विदर्भाची भाग्यरेषा ठरणारा रेल्वे मार्ग पूर्णत्वास जाईल, अशी आशा जनतेला आहे.

Edited By : Atul Mehere

Khamgaon Railway Station
Buldhana Scam : शेळी, बोकड वाटपात लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांचे हात ओले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com