खासदार चिखलीकर पोटनिवडणुकीच्या पराभवावर बोलेच ना

(Bjp Mp Pratap Patil Chikhlikar)चिखलीकर पोटनिवडणुकीतील पराभवाबद्दल काहीच बोलायला तयार नाहीत. वारंवार संपर्क साधून देखील त्यांनी `नंतर बोलतो`, म्हणत या विषयाला बगल दिली.
Chavan-Khatgaonkar-Chikhlikar
Chavan-Khatgaonkar-ChikhlikarSarkarnama

नांदेड ः भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत विजयाचा दावा केला होता. ऐनवेळी खतगांवकर भाजप सोडून काॅंग्रेसमध्ये गेल्यानंतरही त्यांचा दावा कायम होता. उलट खतगांवकर यांनी भाजपमध्ये येतांना अशोक चव्हाण यांच्यावर केलेल्या आरोपांच्या जुन्या व्हिडिओ क्लीप व्हायरल करत आक्रमक पावित्रा घेतला होता. मात्र सगळी शक्ती पणाला लावून देखील चिखलीकर यांना यश आले नाही.

अशोक चव्हाण यांनी खतगांवकरांची घरवापसी करत तेव्हा खासदार चिखलीकर व भाजपला दिलेला `जोर का झटका`, चांगलाच बसला. कारण पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आठवड्यापेक्षा जास्त काळ उलटला तरी चिखलीकर या पराभवाबद्दल काहीच बोलत नाहीयेत. त्यामुळे त्यांच्या या मौन आणि आत्मचिंतनाची जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागली.

देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीतील विजयाने महाविकास आघाडी सरकारला दहा हत्तीचे बळ आले आहे. नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाण यांचे नाणेच खणखणीत असल्याचे देखील या निकालाने शिक्कामोर्तब केले. पण खासदार प्रताप पाटील चिखलीकरांसाठी मात्र हा पराभव धक्कादायक आणि त्यांच्या प्रतिष्ठेला ठेच पोहचवणारा ठरला आहे.

माजी आमदार सुभाष साबणे यांना भाजपमध्ये प्रवेश देत उमेदवारी देण्याचा निर्णय सर्वस्वी चिखलीककरांचाच होता हे स्पष्ट झाले आहे. कारण भास्कर खतगांवकर यांनी भाजपला रामराम करतांना चिखलीकर यांच्या एकाधिकारशाहीवर बोट ठेवतच पक्ष सोडला होता. खतगांवकरांचा विरोध डावलून साबणे यांना उमेदवारी मिळवून देण्यात चिखलीकर यशस्वी ठरले होते, पण त्यामुळे नाराज झालेल्या खतगावकरांनी चिखलीकरांना आपली ताकद दाखवून दिली.

जिल्ह्याच्या राजकारणात महाविकास आघाडीच्या या विजयाने उलथापालथ सुरू झाली आहे. अशोक चव्हाण यांनी भाजपचे आमदार राजेश पवार यांना थेट काॅंग्रेसमध्ये येण्याची दिलेली आॅफर, भाजप जिल्हाध्यक्षांची सुरू असलेली घालमेल पाहता भाजप पोटनिवडणुकीतील पराभवाने बॅकफूटवर गेली एवढे मात्र निश्चित.

या पराभवाने वैयक्तिक चिखलीकरांचे देखील नुकसान झाले असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. पक्षश्रेष्ठींनी चिखलीकरांनी सांगितलेल्या उमेदवाराला डोळे झाकून उमेदवारी दिली, प्रचारात जोर देखील लावला, पण खतगांवकर,पोकर्णा यांच्या एका खेळीने या सगळ्यावर पाणी फिरले. चिखलीकरांना याची कल्पना होती, परंतु अतिआत्मविश्वास त्यांना नडला.

Chavan-Khatgaonkar-Chikhlikar
भाजप नेता बरळला, 'एका खिशात ब्राह्मण तर दूसऱ्यात बनिया समाज'

चव्हाण-खतगांवकर या मेव्हुणे-भावजी जोडीने चिखलीकरांना चांगलाच धक्का दिला. त्यामुळे चिखलीकर पोटनिवडणुकीतील पराभवाबद्दल काहीच बोलायला तयार नाहीत. वारंवार संपर्क साधून देखील त्यांनी `नंतर बोलतो`, म्हणत या विषयाला बगल दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com