MP Fauzia Khan News : विरोधी पक्षाशिवाय विधेयक, चर्चा अन् ते मंजूर केल्याबद्दल प्रशंसा, हे पहिल्यांदाच घडतंय..

Loksabha Winter Session : विधेयकात सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीना हटवण्यात आले असून पंतप्रधान, विरोधी पक्षनेते, केंद्रीय मंत्र्यांच्या समावेश.
Ncp Mp Fauzia Khan News Parbhani
Ncp Mp Fauzia Khan News ParbhaniSarkarnama
Published on
Updated on

Parbhani NCP News : केंद्र शासनाला विरोधी पक्ष नकोय म्हणूनच विरोधी संसद सदस्यांना निलंबित करून केंद्र शासन विरोधी पक्षाला संपवू पाहत आहेत. सरकारचे हे धोरण लोकशाहीची हत्या करणारे आहे. (MP Fauzia Khan News) अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) गटाच्या राज्यसभा सदस्य डॉ. फौजिया खान यांनी केली.

Ncp Mp Fauzia Khan News Parbhani
Parliament Winter Session: निलंबनाच्या कारवाई विरोधात खासदार आक्रमक; संसदेच्या बाहेर काढला मोर्चा

संसदेत घुसखोरीची घटना घडल्यामुळे विरोधी पक्षाच्या सदस्यांनी संसद परिसराच्या सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटीबाबत चौकशीची मागणी केली. यादरम्यान गोंधळ झाल्यामुळे सभापतींनी गोंधळात सहभागी सदस्यांना निलंबित केले. यात (NCP) राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांचा समावेश आहे.

संसदेतील घुसखोरी करणाऱ्या तरुणाना भाजपच्या ज्या खासदाराने प्रवेश पास दिला त्याला निलंबित केले पाहिजे. (Delhi Session) मात्र संसदेतील सुरक्षाव्यवस्थेसंबंधी चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या विरोधी पक्षाच्या संसद सदस्यांना सभापतींनी निलंबित केले. (Parbhani) हा अन्याय असून देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर संसद सदस्यांना निलंबित केले गेले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विरोधी पक्षाशिवाय लोकशाही अपूर्ण आहे. विरोधी पक्षाच्या सदस्याविना संसदेची प्रक्रिया पार पाडली जात आहे. दि. 21 रोजी देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असणारे विधेयक संसदेत मांडले गेले. परंतु यावेळी संसदेत विरोधी पक्षाचा एकही सदस्य उपस्थित नव्हता. केवळ सत्ताधारी पक्षाचे सदस्य उपस्थित होते. मात्र तरीही हे विधेयक मांडले गेले.

त्यावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनीच चर्चा केली. प्रशंसा केली आणि ते विधेयक मंजूरही होईल. निवडणूक आयुक्तांची निवड करण्याचे विधेयक सुध्दा अशाच पद्धतीने मंजूर करण्यात आले. निवडणूक आयुक्त नियुक्त करण्यासाठीच्या समितीत सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीचा समावेश होता. मात्र केंद्र शासनाने मंजूर केलेल्या विधेयकात सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीना हटवण्यात आले असून आता त्या समितीत पंतप्रधान, विरोधी पक्षनेते व केंद्रीय मंत्र्यांच्या समावेश असणार आहे.

Ncp Mp Fauzia Khan News Parbhani
Ncp Protest: 'मोदी सरकार भेकड...'; राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याने डागली तोफ

यामुळे आता केंद्र शासन त्यांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची नियुक्ती करू शकते. असे झाले तर देशातील निवडणुका निष्पक्ष पद्धतीने कशा होऊ शकतील ? असा सवालही खान यांनी केला. या सर्व घटना लोकशाहीच्या हत्या करणाऱ्या आहेत, असेही त्या म्हणाल्या. केंद्र शासनाच्या या लोकशाहीविरोधी कृत्यांचा निषेध करण्यासाठी इंडिया आघाडीचे संसद सदस्य उद्या, 22 रोजी जंतर मंतर येथे आंदोलन करणार आहेत असेही फौजिया खान यांनी सांगितले.

Edited By : Jagdish Pansare

Ncp Mp Fauzia Khan News Parbhani
Parbhani NCP Politics News : डीपीडीसीत `दादागिरी`, शिंदे सेनेच्या पदरी पुन्हा उपेक्षाच...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com