Ncp Protest: 'मोदी सरकार भेकड...'; राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याने डागली तोफ

Prashant Jagtap: खासदारांच्या निलंबनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन.
Narendra Modi : Amit Shah
Narendra Modi : Amit Shah Sarkarnama
Published on
Updated on

Pune: संसदेत प्रश्न विचारणाऱ्या खासदारांचे थेट निलंबन आले आहे. यामध्ये बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह शिरूरचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या निषेधार्थ पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली वारजे येथे हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात मोदी सरकारच्या धिक्काराच्या घोषणा देत केंद्र सरकारचा निषेध केला. एकीकडे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सभागृहात मांडले म्हणून महासंसदरत्न पुरस्कार जाहीर होतो. तर दुसरीकडे संसदेत प्रवेश करणाऱ्यांना प्रवेश करण्याची परवानगी देणारा पास कोणी दिला याची विचारणा करत गृहमंत्र्यांनी निवेदन करावे, अशी मागणी केली तर सभागृहातून निलंबित करायचे, संसदेत प्रश्न उपस्थित करणाऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी मोदी सरकारची ही भूमिका हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल करणारी आहे. खरे बोलले की कारवाई करणारे मोदी सरकार भेकड असल्याची टीका शहराध्यक्ष जगताप यांनी यावेळी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Narendra Modi : Amit Shah
Devendra Fadanvis : मराठा आरक्षण आंदोलनात किती गुन्हे दाखल; त्याचे पुढे काय झालं ? फडणवीस म्हणाले..

मोदी सरकारने घेतलेला निर्णय देशाच्या स्वातंत्र्यासाठी लोकशाहीसाठी बलिदान दिलेल्या सर्व स्वातंत्र्यवीरांचा, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा व संसदेचा अपमान करणारा आहे. मोदी सरकारची हुकूमशाही मुळापासून नष्ट करण्यासाठी आणि लोकशाही वाचविण्यासाठी हा आपला लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

या आंदोलनामध्ये काका चव्हाण, स्वप्नील दुधाणे, डॉ. सुनील जगताप, गिरीश गुरणानी, किशोर कांबळे, मनाली भिलारे, शरद दबडे, सुरेश गुजर, ज्योती सूर्यवंशी यांच्यासह अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते.

Edited By - Chaitanya Machale

Narendra Modi : Amit Shah
Maharashtra Forest Department: बांबू संशोधन-प्रशिक्षण केंद्रात नोकरी हवीय? ; 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com