Maratha Reservation News : मराठ्यांच्या विरोधात बोलून ओबीसींचे नेते राज्यातील वातावरण बिघडवत आहेत. उद्यापासून त्यांनी मराठ्यांबद्दल बोलणे बंद करावे, आमचा-तुमचा काहीही संबंध नाही. (Manoj Jarange Patil News) मराठ्यांना आरक्षण असे द्या, तसे द्या हे ज्ञान ओबीसी नेत्यांनी पाजळणे उद्यापासून बंद करावे, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी नेत्यांना खडसावले आहे.
आमचा लढा हा मराठ्यांच्या न्यायासाठी आहे, आम्ही ओबीसींच्या विरोधात बोलत नाही, तु्म्ही बोलू नका. तुम्हाला काय भांडायचे ते सरकारशी भांडा, असा सल्लाही जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतून दिला आहे. (Maratha Reservation) राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष चिघळताना दिसत आहे. कुणबी जात प्रमाणपत्र आणि त्याआधारे ओबीसी (OBC) आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दोन महिन्यांपासून अंतरवाली सराटीत साखळी उपोषण सुरू आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कुणबींच्या नोंदी मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. नाशिक, नगर जिल्ह्यात तर हजारो, लाखोंच्या नोंदी आढळल्याने ओबीसी नेत्यांमधील अस्वस्थता दिवसेंदिवस वाढत आहे. (Marathwada) यातून मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला आता ओबीसी नेत्यांकडून टोकाचा विरोध होऊ लागला आहे. दहा दिवसांचे उपचार घेऊन अंतरवालीत परतलेले जरांगे पाटील यांनी ओबीसी नेत्यांकडून होत असलेल्या भडकाऊ वक्तव्यांवर संताप व्यक्त केला.
ओबीसी नेते बबनराव तायवडे यांनी मनोज जरांगे पाटील हे राज्यातील वातावरण बिघडवत असल्याचा आरोप केला होता. या संदर्भात माध्यमांनी विचारले तेव्हा जरांगे पाटील चांगलेच भडकले. जे नेते आमच्यावर आरोप करतात त्यांना आम्ही ओळखतही नाही. आम्ही मराठा आरक्षणाचा न्याय लढा लढतो आहोत, त्यामुळे आधी मराठ्यांविरुद्ध ओबीसी नेत्यांनी बोलणे बंद करावे. त्यांच्या बोलण्यानेच वातावरण खराब होत आहे. आम्ही ओबीसींबद्दल काही बोलत नाही, त्यांनीही मराठ्यांबद्दल बोलू नये. आमचा तुमचा काय संबंध आहे?
मराठा समाजाला असे आरक्षण द्या, तसे द्या हे ज्ञान पाजळणे उद्यापासून ओबीसी नेत्यांनी बंद केले पाहिजे. तुम्हाला काय भांडायचे ते सरकारला भांडा, आमच्या विरोधात बोलून वातावरण तुम्ही बिघडवत आहात? असा पलटवार जरांगे पाटील यांनी केला. जरांगे पाटील यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे आता ओबोसी विरुद्ध मराठा या संघर्षाला येणाऱ्या काळात वेगळे वळण लागू शकते. छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, बबनराव तायवडे या नेत्यांकडून सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर आता जरांगे पाटील यांनीही `जशास तसे` अशी भूमिका घेतल्याचे दिसत आहे.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.