Mp Imtiaz Jalil News : भेदरलेल्या ठेवीदारांच्या बाजूने इम्तियाज जलील मैदानात..

Aimim : समाजकारण आणि राजकारण या एकाच नाण्याच्या बाजू असल्यामुळे निश्चितच इम्तियाज यांनी मतांच्या बेरजेचे राजकारणही केले.
Mp Imtiaz Jalil News
Mp Imtiaz Jalil News Sarkarnama
Published on
Updated on

Marathwada News : आयुष्यभर कष्ट करून कमावलेली जमापुंजी एका झटक्यात होत्याची नव्हती झाली, तर काय अवस्था होईल. छत्रपती संभाजीनगराती शेकडो ठेवीदारावर आज ही वेळ आली आहे. आदर्श सहकारी पंतसंस्थेत दोनशे कोटींचा घोटाळ्या झाल्यामुळे ठेवीदार आपले पैसे मिळवण्यासाठी संस्थेच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करत आहेत. (Mp Imtiaz Jalil News) एरव्ही कुठल्याही सुख, दुःखात सहभागी होवून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करणारे राजकीय नेते, पुढारी दोन दिवस उलटून देखील ठेवीदारांच्या मदतीला धावून आलेले नाहीत.

Mp Imtiaz Jalil News
Sandipan Bhumre News : बैलगाडीतून मिरवणूक, बॅंड अन् हारतुरे ; भुमरेंचा जंगी वाढदिवस..

सत्ताधाऱ्यांनी या घोटाळ्याकडे दुर्लक्ष केले असले तरी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी मात्र या विषयात आता उडी घेतली आहे. सलग दुसऱ्या दिवशी इम्तियाज यांनी आदर्श सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयसमोर आंदोलनाला बसलेल्या ठेवीदारांच्या भेटी घेवून त्यांच्या व्यथा ऐकूण घेतल्या. (Aimim) आता या ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी ते समोवारी क्रांतीचौकातून पोलिस आयुक्तालयावर मोर्चा काढणार आहेत.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अनपेक्षितपणे विजयी झालेले इम्तियाज जलील यांचा विरोधक `अॅक्सी़डेंटल खासदार` असा उल्लेख करतात. (Marathwada) परंतु गेल्या चार वर्षाच्या खासदारकीच्या काळात इम्तियाज जलील यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नावर लोकसभेत आणि रस्त्यावर उतरून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सहाजिकच २५ वर्ष खासदार असलेल्या आणि पहिल्यांदाच निवडून आलेल्या खासदाराच्या चार वर्षाच्या कामगिरीची तुलना केली, तरी इम्तियाज जलील सरस ठरतात, असे म्हणटले तर वावगे ठरणार नाही.

समाजकारण आणि राजकारण या एका नाण्याच्या दोन बाजू असल्यामुळे निश्चितच इम्तियाज यांनी मतांच्या बेरजेचे राजकारणही केले. आदर्श पतसंस्थेत ठेवी अडकलेले काही लोक हे त्यांच्या मतदारसंघातील मतदार असू शकतात, तर काहींचा या मतदारसंघाशी संबंधही नसले. पण संकटाच्या काळात मदतीला धावून आलेल्या व्यक्तीची नेहमीच आठवण ठेवली जाते, तशी या प्रकरणात न्याय मिळाल्यावर ठेवीदार इम्तियाज जलील यांची नक्कीच ठेवतील.

पंतसंस्थेच्या घोटाळ्यात एमआयएमने उडी घेतल्यामुळे कदाचित उद्या, इतर राजकीय पक्षांना देखील जाग येईल. त्यांचे नेते, लोकप्रतिनिधी देखील ठेवीदारांच्या भेटी घेतील. पण एमआयएमने मात्र सुरूवातीलाच ठेवीदारांच्या बाजूने मैदानात उडी घेत बाजी मारली असेच म्हणावे लागेल. आता त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात एवढीच अपेक्षा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com