Sandipan Bhumre News
Sandipan Bhumre News Sarkarnama

Sandipan Bhumre News : बैलगाडीतून मिरवणूक, बॅंड अन् हारतुरे ; भुमरेंचा जंगी वाढदिवस..

Shivsena : गेल्या ३०-३५ वर्षापासून राजकारणात असलेल्या भुमरेंनी सहावेळा पैठणमधून विधानसभेची निवडणूक लढवली.
Published on

Shivsena : महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री आणि त्यानंतर शिंदेंच्या बंडात सहभागी होवून स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारमध्येही तेच खाते मंत्रीपद मिळवलेल्या संदीपान भुमरे यांचा आज वाढदिवस. (Sandipan Bhumre News) जिल्ह्याचे पालकमंत्री असतांना भुमरे यांनी वाढदिवस साजरा करण्यासाठी आपले गावचं निवडले. पाचोड या आपल्या गावात संदीपान भुमरे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला जात आहे.

Sandipan Bhumre News
Ambadas Danve On Shinde-Pawar : अजित पवारांना मुख्यमंत्री अन् शिंदेना अर्थमंत्री करा, दानवेंचा अजब सल्ला..

एरव्ही मंत्र्याचा वाढदिवस म्हटलं की तामझाम, भपकेबाजपणा हे आलेच. (Shivsena) पण भुमरे यांनी मात्र या सगळ्या गोष्टीला फाटा देत चक्क बैलगाडीतून काढलेल्या मिरवणूकीद्वारे लोकांच्या शुभेच्छा स्वीकारला. (Guardian Minsiter) पाचोडमध्ये सकाळापासून भुमरे यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा देण्यासाठी समर्थकांनी गर्दी केली होती. भुमरेंनी देखील सगळे कार्यक्रम रद्द करत आजचा दिवस फक्त गाव आणि मतदारसंघासाठी राखीव ठेवला.

भुमरे यांच्या राजकाराणाची सुरूवात पाचोडमधून झाली. ग्रामपंचायतीपासून राजकारणाला सुरूवात केलेल्या भुमरे यांना गावाने, (Paithan) पैठण विधानसभा मतदारसंघाचे भरभरून प्रेम दिले. पाचवेळा आमदार आणि दोनवेळा मंत्री केले. त्यामुळे भुमरे यांचे पाचोडवर विशेष प्रेम आहे. आज वाढदिवसाची सुरूवात गावातून केल्यानंतर दिवसभर ते मतदारसंघातील नागरिकांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत.

पाचोडमध्ये त्यांच्या समर्थकांनी त्यांची चक्क बैलगाडीतून मिरवणूक काढली. गाडीपुढे बॅन्ड वाजत होता, तर ज्योतपुरीमध्ये भुमरे बैलगाडीवर धरलेल्या आकर्षक छत्रीमध्ये उभे राहून स्वागताचा स्वीकार करत होते. उपरणं, टोपी, हार घालून लोक पेढ्याने त्यांचे तोंड गोड करत होते. गेल्या ३०-३५ वर्षापासून राजकारणात असलेल्या भुमरेंनी सहावेळा पैठणमधून विधानसभेची निवडणूक लढवली. पैकी पाचवेळा ते जिंकले आणि दोनवेळा राज्याच्या मंत्रीमंडळात रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री झाले. गेल्यावेळी पालकमंत्रीपदाची हुकलेली संधी त्यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मिळाली.

त्यांच्या रुपाने कित्येक वर्षानंतर जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री मिळाला होता. आपल्या राजकीय कारकीर्दीत भु्मरे यांनी ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटी, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, बाजार समिती, विधानसभा अशा सगळ्याच निवडणुकांमध्ये आपले वर्चस्व पाचोड आणि पैठण मतदारसंघावर कायम ठेवले. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरही त्यांनी मतदारसंघावरील आपली पकड ढिली होवू दिलेली नाही. आगामी जिल्हा परिषद, लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता भुमरे यांनी या वाढदिवसाच्या माध्यमातून जोरदार शक्तीप्रदर्शनही केल्याचे दिसून आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com