Imtiyaz Jaleel News : फडणवीस गृहमंत्री, मग त्यांना छत्रपती संभाजीनगरची दंगल..?खासदार जलील यांचा गंभीर आरोप

Chhatrapati Sambhajinagar Politics : भारतीय जनता पार्टीने देशातून संविधान मिटवायचा निश्चय केला आहे.
Imtiyaz Jaleel News
Imtiyaz Jaleel NewsSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati SambhajiNagar : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगरमधील दंगल ही पूर्वनियोजित होती असा खळबळजनक दावा केला होता. यावरुन छत्रपती संभाजीनगरचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मोठं विधान केलं आहे. फडणवीस हे गृहमंत्री आहेत, त्यांना ही दंगल पूर्वनियोजित आहे सांगण्यासाठी एवढा वेळ का लागला असा सवाल उपस्थित केला आहे.

इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी फडणवीसांच्या आरोपावर भाष्य केलं आहे. जलील म्हणाले, देवेंद्र फडणवीस आता म्हणत आहेत की, ही दंगल पूर्वनियोजित आहे. मी हे पहिलेच सांगितलं आहे. जेव्हा राज्य सरकारने प्रतिसाद दिला नाही, तेव्हा मी प्रधानमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र पाठवलेले आहे.

Imtiyaz Jaleel News
Nana Patole News : राहुल गांधी-ठाकरे भेटीबाबत नाना पटोलेंनी स्पष्टचं सांगितलं..; विरोधकांची मोट..

आता फडणवीसांना विनंती करतो की, त्यांच्या पार्टीचे दोन केंद्रीय मंत्री असून राज्याचे एक मंत्री देखील आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील दंगलीची उच्चस्तरीय चौकशीची मागणी उचलून धरा असंही जलील यावेळी म्हणाले.

देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत, त्यांना एवढा वेळ का लागला की ही दंगल पूर्वनियोजित आहे सांगण्यासाठी असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच घटनेच्या पहिल्या दिवसापासून मी ही दंगल पूर्वनियोजित आहे असं सांगत आलो आहे. तसेच मी जे प्रश्न उपस्थित केले होते त्या प्रश्नाचा आधार घेऊनच फडणवीस ही दंगल पूर्वनियोजित असल्याचं मत व्यक्त करत आहे. मात्र,खुर्चीवर बसून सुद्धा फडणवीस यांना पूर्वनियोजित दंगल असल्याचं सांगायला एवढा वेळ लागला हे दुर्दैव असल्याचंही जलील यांनी सांगितले.

Imtiyaz Jaleel News
BJP NEWS : भाजप आमदाराचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप : ‘हे तर ४० टक्के कमिशन एजंट...’ , प्रतिमेला मारले जोडे

छत्रपती संभाजीनगरमधील पूर्वनियोजित दंगल कोणी घडवून आणली हे मला माहित असलं तरी सांगणार नाही. कारण ही दंगलीमागील मास्टरमाईंड शोधून काढण्याची जबाबदारी तुमची आहे. याचवेळी दंगलीची निवृत्त न्यायाधीशांकडून या हिंसाचाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील जलील यांनी केला आहे. भारतीय जनता पार्टीने देशातून संविधान मिटवायचा निश्चय केला आहे. आणि त्या दृष्टीने त्यांचं काम देखील सुरु असल्याचा आरोपही जलील यांनी केला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com