BJP NEWS : भाजप आमदाराचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप : ‘हे तर ४० टक्के कमिशन एजंट...’ , प्रतिमेला मारले जोडे

CM Basavaraj Bommai - Nehru Olekar: बोम्मई हे तर ४० टक्के कमिशन एजंट आहेत. त्यांनी शिगावी पर्जन्य सिंचन प्रकल्पात १५०० कोटींची लूट केल्याचा गंभीर आरोप आमदार नेहरू ओलेकर यांनी केला.
Chief Minister Basavaraj Bommai-Nehru Olekar
Chief Minister Basavaraj Bommai-Nehru Olekar Sarkarnama
Published on
Updated on

बंगळूर : कर्नाटक (Karnataka) विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) उमेदवारीचा पत्ता कट झाल्यानंतर हावेरीचे भाजप (BJP) आमदार नेहरू ओलेकर यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांच्या गंभीर आरोप केला आहे. बोम्मई हे तर ४० टक्के कमिशन एजंट आहेत. त्यांनी शिगावी पर्जन्य सिंचन प्रकल्पात १५०० कोटींची लूट केल्याचा गंभीर आरोप आमदार नेहरू ओलेकर यांनी केला. (BJP MLA Nehru Olekar accused Chief Minister Basavaraj Bommai of corruption)

हावेरी राखीव मतदारसंघातून भाजपचे तिकीट गेल्याने नेहरू ओलेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना नाराजी व्यक्त करत शेतकऱ्यांना या भाजप सरकारने एक पाइपही दिला नसल्याचे सांगितले. तुषार सिंचन योजना पूर्णपणे अपयशी ठरली आहे. इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नसल्याची तक्रार त्यांनी केली.

Chief Minister Basavaraj Bommai-Nehru Olekar
Karnataka Election : भाजपच्या आणखी दोन आमदारांनी पक्ष सोडला : नाराजांची संख्या वाढली

माझी प्रगती सहन न झाल्याने बसवराज बोम्मई यांनी मला तिकीट नाकारले. त्यांच्याकडे किती दम आणि ताकद आहे, हे बोम्माईंनी दाखवू द्यावे. आम्हीही आमची ताकद दाखवू,' असे आव्हानही ओलेकर यांनी मुख्यमंत्री बोम्मई यांना दिले. सीएम बोम्मई हे ४० टक्के कमिशन एजंट आहेत. बोम्मईंकडून भाजपला मोठा धोका आहे. त्यांचा फायदा करणाऱ्यांना त्यांनी तिकिटे दिली आहेत. बोम्मई भाजपला नेस्तनाबूत करेल. पक्षाचा तो उद्धार करणार नाही, असा एकेरी टोलाही त्यांनी लगावला.

भ्रष्टाचार हे भाजप सरकारचे कर्तृत्व आहे. हायकमांडने तातडीने विचार करावा. अशा भ्रष्ट लोकांकडे दुर्लक्ष केले पाहिजे. भ्रष्टाचाराची कागदपत्रे जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Chief Minister Basavaraj Bommai-Nehru Olekar
Karnataka Assembly Election : कर्नाटकातील विजयासाठी काँग्रेसला महाराष्ट्रातून मोठी 'रसद'!

मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला मारले जोडे

दरम्यान, नेहरू ओलेकर यांच्या शेकडो समर्थकांनी हावेरी शहरातील होसमनी सिद्धप्पा सर्कल येथे निदर्शने करून त्यांना तिकीट नाकारल्याचा निषेध केला. त्यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि जिल्हा युनिट अध्यक्ष सिद्धराज कालाकोटी यांचे चित्र फाडून आणि चप्पलने मारून संताप व्यक्त केला.

दरम्यान, तिकीट नाकारल्यामुळे भाजपचे आमदार नेहरू ओलेकर यांनी गुरुवारी भारतीय जनता पक्षाला रामराम केला. आपणास उमेदवारी डावलण्यास मुख्यमंत्री बसवराज बोम्मई कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला. हजारो भाजप कार्यकर्ते पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचा दावा ओलेकर यांनी केला आहे.

Chief Minister Basavaraj Bommai-Nehru Olekar
Karnataka Election : भाजपचा आणखी सात विद्यमान आमदारांना डच्चू; २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

ते म्हणाले की, आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या मताची वाट पाहू आणि त्यांच्याशी झालेल्या बैठकीच्या निकालाच्या आधारे आम्ही निर्णय घेऊ. त्यांना धजद आणि अन्य पक्षाकडून ऑफर आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, ओलेकर यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दोन वर्षांच्या साध्या कारावासाची शिक्षा झाली होती. त्यानंतर कर्नाटक उच्च न्यायालयाने या आदेशाला स्थगिती दिली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com