Marathwada Political News : भावकी हा शब्द उच्चारला की बहुतांश व्यक्तींच्या चेहऱ्यावर नकारात्मक भाव उमटतात. भावकी ही नेहमी त्रासदायकच असते असा सार्वत्रिक अनुभव सांगितला जातो. राजकीय नेत्यांना सुध्दा हा अनुभव प्रकर्षाने येतो. (Shivsena-Congress News) महाराष्ट्राच्या राजकारणात अशी अनेक उदाहरणं पहायला मिळतात. पंकजा मुंडे, धनंजय मुंडे बहिण भाऊ, अजित पवार, रोहित पवार, संदीप क्षीरसागर-जयदत्त क्षीरसागर काका पुतणे असे अनके नेते राजकारणात दिसतात.
यात ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav) व कॉंग्रेसचे पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश वरपूडकर (Suresh warpudkar) यांच्या सख्ख्या भावांचाही समावेश करावा लागेल. सध्या हे दोघेही भाजपमध्ये आहेत. मात्र ही खरोखरच भावकी आहे की राजकीय सोय आहे असा प्रश्न मात्र सामान्यांना पडला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांचे सख्खे बंधु बाळासाहेब जाधव हे हरिओम मदत केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रात सक्रीय आहेत.
खासदार जाधव यांच्या निवडणूक प्रचारात त्यांचा हिरीरीने सहभाग असायचा. (Shivsena) विशेषतः परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागातून उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना बाळासाहेब जाधव यांच्या हरिओम मदत केंद्राच्या माध्यमातून सर्व प्रकारे मदत केली जाते. (Congress) रुग्णांसाठी अन्नछत्र उपक्रम अव्याहतपणे चालू आहे. या माध्यमातून बाळासाहेब जाधव यांनी मोठा वर्ग जोडला.
मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर बाळासाहेब जाधव यांनी भाजपची साथ देण्याचे ठरवले. भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात, बैठकीत ते हिरीरीने सहभागी असतात. पक्षाने कुठलीही जबाबदारी दिली नसल्याने बाळासाहेब जाधव स्वतःला भाजपचे जनसेवक, असे म्हणवतात. राजकीय व सामाजिक घडामोडीवर व्हिडीओ, समाजमाध्यमातून व्यक्त होणे ही त्यांची खासियत आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार बाबाजानी दुर्राणी व सख्खे बंधु संजय जाधव यांच्याविरोधात ते उघड भूमिका घेत असतात. माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या नुकत्याच झालेल्या परभणी येथील कार्यक्रमात बाळासाहेब जाधव यांनी बंधू खासदार जाधव यांच्यावर जाहीरपणे टीका केली. तर दुसरीकडे कॉंग्रेसचे पाथरी विधानसभेचे आमदार सुरेश वरपूडकर हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असताना त्यांचे सख्खे बंधु विजय वरपूडकर हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते.
आमदार सुरेश वरपूडकर यांच्या प्रचाराची धुरा विजय वरपूडकर यांच्याकडे असायची. मात्र विजय वरपूडकर यांनी अनपेक्षितपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांची प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी निवड करण्यात आली. राजकीय मतभेदांमुळे सख्खे भाऊ पक्के वैरी झाले आहेत की, व्यक्तिगत मतभेदांमुळे विरोधी असणाऱ्या राजकीय पक्षात प्रवेश केला गेला याबाबत सामान्य नागरिकांमध्ये अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. किंबहुना हे सर्व राजकीय सोयीसाठी तर नाही ना? अशीही शंका व्यक्त केली जात आहे.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.