Chhatrapati Sambhajinagar News : धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर सोमवारी आपले वडील पवनराजे निंबाळकर यांच्या आठवणीने गहिवरले. पवनराजे यांच्या 71 व्या जन्मदिनानिमित्त त्यांना अभिवादन करताना खासदार ओमराजे (Omraje) यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. आपण राजकारणात का आलो? हे सांगताना ओमराजे नेहमी आपल्या वडिलांचा उल्लेख करतात. आपल्या वडिलांना अभिवादन केल्यानंतर ओमराजे यांनी त्यांच्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला.
मला वडिलांचा सहवास खूप कमी मिळाला, पण कमी वेळात त्यांनी आयुष्यभराची मोठी शिकवण मला दिली, असे म्हणत ओमराजेंनी त्यांना अभिवादन केले. राजेसाहेब आज तुम्ही खरंच असायला हवे होते. वडिलांना जाऊन अनेक वर्षे झाली, पण त्यांची उणीव प्रत्येकक्षणी जाणवते. सार्वजनिक जीवनात असल्याने राजेसाहेबांचा सहवास कमी मिळाला असला तरी त्यांनी त्या कमी सहवासात आयुष्यभराची शिकवण आम्हाला दिली, असे ओमराजे म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आमचा पूर्ण परिवार त्यांनी दाखविलेल्या मार्गानेच मार्गक्रमण करत असताना तेच आपल्यात नसल्याची जाणीव पावलोपावली जाणवते. त्यांनी आपल्या हयातीत सामान्य माणूस हाच आपला परिवार मानून कायम सामान्य माणसात राहणे पसंत केले. मीसुद्धा त्यांचे हे तत्त्व तंतोतंत पाळायचा प्रयत्न करत आहे. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी लढाई मी लढत असताना जनतेचे प्रेम आशीर्वाद तर आहेतच, पण वडील म्हणून राजेसाहेब मला तुमच्या नसण्याची कमी कायम जाणवत आहे, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार ओमराजे (MP Omraje) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
तुमच्या नावानेच माझी ओळख आहे आणि ती तशीच राहावी व आयुष्यभर तुमच्या या नावाला अभिमान वाटेल असेच कार्य करत राहीन..! माझ्या दोन दैवतांची जयंती ही एकाच दिवशी असते, त्यामुळे हा दिवस माझ्यासाठी कायमच विशेष आहे. शिवजयंती व राजेसाहेब यांची जन्मदिनानिमित्त ही एकाच दिवशी येते. समोर असताना वडील म्हणून जास्त व्यक्त होता आले नाही, पण आज खरंच सांगतो राजेसाहेब सामान्य माणसासाठी आज तुम्ही खरंच असायला हवे होते..! अशा शब्दांत ओमराजे यांनी पवनराजेसाहेबांच्या 71 व्या जयंतीनिमित्त आठवणींना उजाळा दिला.
Edited By : Chaitanya Machale
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.