Marathwada Political News : शिवसेनेतील पक्षफुटीनंतर ठाकरे गटाने कार्यकारिणीचा विस्तार केला असून, या माध्यमातून शिवसेना ठाकरे गटाने शक्तिस्थान अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे. (Shivsena UBT News) निष्ठावंत सैनिकांना बळ आणि संभाव्य पडझड टाळणे हा उद्देश समोर ठेवून कार्यकारिणी जाहीर केल्याचे स्पष्ट होते. शिवसेना नेते दिवाकर रावते हे परभणीचे संपर्कप्रमुख असताना त्यांनी घडवलेली शिवसेना नेत्यांची फळी आज पक्षासोबत नाही.
माजी खासदार तुकाराम रेंगे हे कॉंग्रेसमध्ये गेले तर माजी खासदार सुरेश जाधव, माजी आमदार हरिभाऊ लहाने, माणिकराव आंबेगावकर, माजी जिल्हाप्रमुख भास्कर लंगोटे हे सर्व शिंदे गटात सामील झाले आहेत. (Parbhani) तसेच शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांना वरिष्ठ पातळीवरून बळ मिळत आहे. (Sanjay Jadahv) जिंतूर विधानसभा भाजपकडे आहे तर गंगाखेड विधानसभा भाजप मित्रपक्षाकडे आहे.
पाथरी विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेस व भाजपची लढत आहे. परभणी विधानसभा मतदारसंघ वगळता जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची स्थिती कमकुवत आहे. (Marathwada) विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने जोरात तयारी सुरू केली आहे, तर राष्ट्रवादी अजित पवार गटानेही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर परभणी लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडे असणे अतिशय आवश्यक आहे.
शेजारील हिंगोली जिल्ह्यातही ठाकरे गटाला संघर्ष करावा लागणार आहे. हिंगोली विधानसभा मतदारसंघ भाजपकडे आहे, तर कळमनुरी मतदारसंघातील आमदार संतोष बांगर यांनी घूमजाव करत शिंदे गटात प्रवेश केला. वसमत मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात आहे. यामुळे परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत ठाकरे गटाला बळ देण्यासाठी निष्ठावंत तसेच आक्रमक चेहऱ्याची आवश्यकता होती.
परभणीचे खासदार संजय जाधव यांची उपनेतेपदी नियुक्ती केल्याने परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ठाकरे गटाला बळ मिळणार आहे. एक सामान्य शिवसैनिक ते जिल्हाप्रमुख, आमदार, खासदार आणि आता शिवसेना उपनेतेपद असा राजकीय प्रवास करणारे संजय जाधव स्पष्ट व बेधडक बोलण्यासाठी ओळखले जातात. महाविकास आघाडी सरकार असताना सामान्य शिवसैनिकाला न्याय देता येत नसल्याचे सर्वात प्रथम जाधव यांनीच जाहीरपणे बोलून दाखवले होते.
आपल्या खासदारकीचा राजीनामाही त्यांनी पक्षप्रमुखांकडे दिला होता. पक्षात फूट पडल्यानंतर जाधव हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले. जाधव यांना उपनेतेपद मिळाल्याने पक्षात त्यांचे वजन वाढले आहे. मात्र, मागील काळात जाधव आणि आमदार डॉ. राहुल पाटील यांच्यात बेबनाव असल्याचे अनेक प्रसंगातून दिसून आले होते. पक्षाचे उपनेतेपद मिळाल्यानंतर पक्षाच्या सर्व नेत्यांसह सामान्य शिवसैनिकांना संघटित करण्याचे राजकीय कौशल्य जाधव यांना दाखवावे लागणार आहे.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.