MP Vasant Chavan News : तर खासदार म्हणून मनोज जरांगे जो आदेश देतील तो पाळू असे वसंत चव्हाण का म्हणाले !

Maratha Leader Manoj Jarange : लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे न केल्यामुळे राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांची दखल घेतली नाही. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी 288 उमेदवार पाडण्याचा इशारा दिला आहे.
MP Vasant Chavan- Manoj Jarange
MP Vasant Chavan- Manoj JarangeSarkarnama

Nanded News : मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीपुर्वी मराठा आरक्षणावर राज्य सरकारने निर्णय घेतला नाही, तर उमेदवार देण्याचे जाहीर केले होते. परंतू नंतर त्यांनी ही भूमिका बदलली आणि समाजासाठी ज्याने काम केले नाही, त्याला पाडा असे आवाहन केले होते. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत राज्यात विशेषतः मराठवाड्यात दिसला.

आठ पैकी फक्त छत्रपती संभाजीनगरची जागा महायुतीला जिंकता आली. आता पुन्हा विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवार पाडा, असे आवाहन जरांगे पाटील आपल्या मराठवाडा शांतता संवाद दौऱ्यातून करत आहेत. लोकसभेच्या नांदेड मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार वसंत चव्हाण यांनी या पार्श्वभूमीवर महत्वाचे विधान केले आहे.

लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे न केल्यामुळे राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांची दखल घेतली नाही. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी 288 उमेदवार पाडण्याचा इशारा दिला आहे.

अर्थात त्यासाठी ते या सगळ्या मतदारसंघात उमेदवार उभे करतात का? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या आठ-दहा महिन्यापासून आंदोलन सुरू केले आहे.

MP Vasant Chavan- Manoj Jarange
Manoj Jarange Patil News : 'देवेंद्र फडणवीस तुम्ही आमचे शत्रू नाहीत,पण...'; जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले?

सरकारने गेल्यावेळी त्यांच्या काही मागण्या मान्य केल्या, पण अर्ध्या मागण्यांवर अजूनही सरकार निर्णय घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे नांदेड जिल्ह्याचा खासदार म्हणून मनोज जरांगे पाटील जो आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही पुढे काम करू, अशी ग्वाही काँग्रेसचे (Congress) खासदार वसंत चव्हाण यांनी दिली.

लोकसभेत या विषयावर माझ्याकडून प्रश्न उपस्थितीत केले जातील. संसदेत या विषयावर चर्चा व्हावी,असा माझा प्रयत्न राहील, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.मनोज जरांगे पाटील यांना मराठा समाजा मोठा पाठिंबा राज्यभरातून मिळतो आहे.

MP Vasant Chavan- Manoj Jarange
Manoj Jarange Patil News : 'देवेंद्र फडणवीस तुम्ही आमचे शत्रू नाहीत,पण...'; जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले?

नांदेडमध्ये (Nanded) झालेल्या शांतता संवाद रॅलीत शहर व ग्रामीण भागातून लाखोच्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते.सरकारकडून आपल्याला न्याय मिळत नाही, अशी प्रत्येकाची भावना आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेली मुदत 13 जुलैला संपत आहे. त्याआधीच मराठा आरक्षणाच्या विषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा खासदार वसंत चव्हाण यांनी व्यक्त केली.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com