Dhananjay Munde News : कोणत्याही अडचणीत सोबत राहू, क्षीरसागर पिता-पुत्राला मुंडेंनी दिला शब्द..

NCP News : काका आणि चुलत भावाला पक्षात घेत मुंडे- अजित पवार जोडीने आमदार संदीप क्षीरसागर यांच्यापुढे मोठे आव्हान उभे केले.
Dhananjay Munde News
Dhananjay Munde NewsSarkarnama

Beed Political News : बीड जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ट्विस्ट आला आहे. राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर `सदैव साहेबांसोबतच`, म्हणणाऱ्या आमदार संदीप क्षीरसागर यांना अजित पवारांनी मोठा दणका दिला आहे. (Kshirsagars Join NCP) काका आणि चुलत भावाला पक्षात घेत मुंडे- अजित पवार जोडीने आमदार संदीप क्षीरसागर यांच्यापुढे मोठे आव्हान उभे केले आहे.

Dhananjay Munde News
Ambadas Danve News : तृतीयपंथीयांच्या कल्याणकारी बोर्डासाठी प्रयत्न करणार..

डाॅ. भारतभूषण क्षीरसागर आणि त्यांचे चिरंजीव डाॅ.योगेश क्षीरसागर यांनी आज मुंबईत अजित पवार, धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश केला. या प्रवेशाचे खरे सूत्रधार हे कृषिमंत्री धनंजय मुंडे हेच होते. (Beed News) त्यामुळे कुठल्याही अडचणीत सोबत राहू, असा विश्वास या निमित्ताने त्यांनी क्षीरसागर पिता-पुत्राला दिला.

बीडचे माजी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर,डॉ.योगेश क्षीरसागर यांनी अनेक नगरसेवक,जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य,ग्रामपंचायत सदस्य व सहकाऱ्यांसह अजित पवार यांच्या नेतृत्वात व प्रांताध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत (NCP) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. धनंजय मुंडे या प्रवेश सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते.

त्यांनी भारतभूषण, डॉ. योगेश व सर्व सहकाऱ्यांचे स्वागत केले. बीड जिल्ह्याच्या विकासाच्या प्रक्रियेत भविष्यात एकत्र काम करताना कोणत्याही प्रकारच्या अडचणीत सोबत राहू, असा शब्दही मुंडेंनी दिला. मुंबईत हा प्रवेश झाल्यानंतर आता बीडमध्ये २७ रोजी होणाऱ्या जाहीर सभेत या दोघांचा पुन्हा जंगी प्रवेश केला जाणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com