Municipal commissioner News : क्रिकेट स्टेडियमसाठी आयुक्त घेणार बीसीसीआयचे सचिव शहांची भेट ..

Aurangabad : यासंदर्भात बीसीसीआयचे सचिव जय शहा यांची भेट घेऊन चर्चा केली जाणार आहे.
Municipal commissioner News
Municipal commissioner NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : मराठवाड्याच्या राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी पुढाकार घेतला आहे. (Municipal Commissinoer News) बीसीसीआयचे सचिव जय शहा यांची भेट घेण्याची तयारी त्यांनी केली आहे. दरम्यान गरवारे क्रिडा संकुलाची पर्यटन विकास महामंडळाला कलाग्रामसाठी देण्यात आलेली जागा महापालिकेला परत देण्याची तयारी एमआयडीसी, पर्यटन विकास महामंडळाने दाखविली असल्याचे जी. श्रीकांत यांनी सांगितले.

Municipal commissioner News
Sambhaji Patil Nilangekar News : लातूर जिल्हा जलयुक्त अन् ज्ञानयुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही..

गरवारे स्टेडियमला आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनविण्यासाठी जी. श्रीकांत यांच्या उपस्थितीत वारंवार बैठका घेतल्या जात आहेत. (Municipal corporation) मंगळवारी (ता. २०) स्मार्ट सिटी कार्यालयात एमआयडीसी व एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. (Aurangabad) या बैठकीत कलाग्रामसाठी देण्यात आलेली जागा परत घेण्यावर चर्चा करण्यात आली. एमआयडीसीने गरवारे स्टेडीयमची २७ एकर जागा महापालिकेला हस्तांतरित केली आहे.

त्यातील दहा एकर जागा पर्यटन विकास महामंडळाला देण्यात आली असून, या जागेवर कलाग्राम उभारण्यात आले आहे. (Marathwada) ही जागा परत घेण्यासाठी एमआयडीसीला पत्र दिले जाणार आहे. एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसेच एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांनी देखील महापालिकेला जागा परत देण्याची तयारी दर्शवली आहे. या जागेवर क्रिकेटचे स्टेडीयम उभारण्यासाठीचे आरक्षण विकास आराखड्यात टाकण्यासाठी डीपी युनिटला पत्र दिले जाणार असल्याचे श्रीकांत यांनी सांगितले.

यासंदर्भात बीसीसीआयचे सचिव जय शहा यांची भेट घेऊन चर्चा केली जाणार आहे. तोपर्यंत आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता करून ठेवावी, असे श्रीकांत यांनी सांगितले. गरवारे क्रीडा संकुलात सध्या क्रिकेट खेळांडूसाठी प्रॅक्टीस पिचेस तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर पुढील वर्षी एप्रिलमध्ये मैदानावर हिरवळ करण्यात येईल.

त्यासोबत रात्रीही सामने भरविण्यासाठी फ्लड लाइट लावण्यासाठी अंदाजपत्रकाचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना शहर अभियंता ए. बी. देशमुख यांना देण्यात आली. महापालिकेचे प्रशासक म्हणून पदभार घेतल्यापासून जी. श्रीकांत यांनी मुलांना मैदानावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com