औरंगाबाद ः राज्यात नुकत्याच झालेल्या महापालिका, नगरपंचायत निवडणुकीच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीची सरशी झाली असून भाजपचा (shivsena) पराभव झाला आहे. मराठवाड्यातील (Marathwada) नांदेड-वाघाळा महापालिका निवडणुकीतील एका जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत काॅंग्रेसचा (Congress) उमेदवार विजयी झाला आहे. तर शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघातील नगर परिषदेच्या एका जागेवरील पोटनिवडणुकीत देखील शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या लोकसभा व विधानसभेचे माजी अध्यक्ष व विद्यमान आमदार हरिभाऊ बागडे यांच्या फुलंब्री मतदारसंघातील नगरपंचायत निवडणुकीतील दोन जांगासाठी झालेल्या पोट निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. पुर्वी या दोन्ही जागा भाजपकडे होत्या.
मराठवाड्यातील २३ नगरपंचायती व काही पोटनिवडणुकीसाठी काल मतदान झाले. मतदारांमध्ये चांगला उत्साह दिसून आल्याने सरासरी ७० ते ८० टक्के मतदान झाले. नगरपंचायतीचा निकाल जानेवारी मध्ये लागणार असला तरी पोटनिवडणुकीचा निकाल मात्र आज जाहीर झाले. सिल्लोड नगर परिषदेच्या एका वार्डाची पोटनिवडणूक झाली होती, ही जागा शिवसेनेने जिंकली असून फातीमाबी पठाण जब्बार खान या येथून विजयी झाल्या आहेत.
तर नांदेड वाघाळा महापालिकेच्या एका वार्डातील पोटनिवडणुकीत काॅंग्रेसच्या मुस्काना सय्यद या विजयी झाल्या. औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री नगरपंचायतीच्या वार्ड क्रमांक २ व वार्ड क्रमांक ८ साठी २१ डिसेंम्बर रोजी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. आज सकाळी दहा वाजता तहसील कार्यालयात मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला.
यामध्ये महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांचा विजय झाला आहे. वार्ड क्रमांक दोन मध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसच्या उमेदवार पूजा आनंदा ढोके २७९ मते घेऊन विजयी झाल्या. तर प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपाच्या विमल ढोके यांना २७७ मते मिळाली. केवळ दोन मताने राष्ट्रवादीच्या पूजा ढोके या विजयी झाल्या. वंचित बहुजन आघाडीच्या संगीता पाबळे याना केवळ ९ मते तर नोटासाठी ५ जणांनी मतदान केले.
वार्ड क्रमांक ८ मध्ये महाविकास आघाडीचे शिवसेनेच्या उमेदवार अर्चना उमेश दुतोंडे यांनी ४३४ मते घेऊन विजय मिळवला. तर भाजपच्या रुपाली बनसोडे यांना केवळ २९०, वंचित बहुजन आघाडीच्या पुष्पा मोरे यांना केवळ ७ मते मिळाली. पुर्वी या दोन्ही वार्डात भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. महाविकास आघाडीच्या विजयानंतर तहसील कार्यालयाच्या आवारातच फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.