प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन राजकारणात येणार?

मला राजकारणाची अॅलर्जी नाही.
Sarangi Mahajan
Sarangi MahajanSarkarnama
Published on
Updated on

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते (स्व.) प्रमोद महाजन यांचे भाऊ (स्व.) प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन ह्या राजकारणात येण्याची शक्यता आहे. आज त्यांनी एका वेबपोर्टलला दिलेल्या मुलाखतीत मला राजकारणाची अॅलर्जी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय प्रवेशाबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. (Will Sarangi Mahajan enter politics?)

ठाणे येथे रहाणाऱ्या सारंगी महाजन यांच्या संपर्कात कोणता पक्ष आहे का? त्या आगामी महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन हे मला वडिलांसारखे होते. मात्र, प्रवीण महाजन यांच्यावर खटला सुरु होता, त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मला अकारण त्रास देत असत. मला आणि माझ्या मुलांना त्या काळात काही झाले असते, तर महाजन-मुंडे कुटुंबीय त्याला जबाबदार ठरले असते, असे मी तेंव्हा म्हटले होते. आता कुटुंबातले तणाव जरा हलके झाले आहेत, असेही सारंगी महाजन यांनी त्या मुलाखतीत म्हटले आहे.

Sarangi Mahajan
मामा आणि भाचेजावयांमध्ये पुन्हा रंगणार सामना

प्रमोद महाजन यांच्या त्यांचे बंधू प्रवीण महाजन यांनी गोळ्या झाडल्या होत्या. उपचारादरम्यान प्रमोद महाजन यांचे निधन झाले होते. त्या घटनेनंतर प्रवीण महाजन यांना अटक होऊन तुरुंगवासही झाला. काही काळानंतर प्रवीण महाजन यांचाही मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेमुळे महाजन कुटुंबीयांमध्ये तेव्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रमोद महाजन यांचा राजकीय वारसा त्यांच्या कन्या पूनम महाजन चालवत आहेत. सध्या त्या भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर मुंबईतून लोकसभेवर सलग दुसऱ्यांदा निवडून आलेल्या आहेत. प्रमोद महाजन आणि प्रवीण महाजन यांचे आणखी एक बंधू प्रकाश महाजन हेसुद्धा राजकारणात सक्रीय होते. ते सुरुवातीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सक्रीय होते. सध्या ते सक्रीय राजकारणापासून जरा दूर गेल्याचे जाणवत आहे.

Sarangi Mahajan
त्यांनी भुंकायचे आणि यांनी धावत सुटायचे : ईडीच्या कारवाईवरून अरविंद सावंतांची भाजपवर टीका

दरम्यान, सारंगी महाजन यांनी ‘मला राजकारणाची अॅलर्जी नाही’ असे वक्तव्य केल्यामुळे महाजन कुटुंबातील आणखी एक व्यक्ती राजकारणात येण्याची शक्यता बळावली आहे. त्या कोणत्या पक्षात जाणार, आगामी निवडणुका लढविणार आहे, हे सर्व मात्र गुलदस्त्यातच आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com