Beed Crime Update: '...म्हणून धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा!'; अजित पवारांचा दाखला देत काँग्रेसच्या नेत्याची मोठी मागणी

Congress Leader Nana Patole On Santosh Deshmukh Case : बीडच्या घटनेवरुन मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला आहे. या घटनेत आमदार सुरेश धस यांनी अधिवेशनात केलेल्या गंभीर आरोपानंतर राजकीय वातावरण आणखीच तापलं आहे.
Santosh Deshmukh Dhananjay Munde  Walmik Karad
Santosh Deshmukh Dhananjay Munde Walmik Karad sarkarnama
Published on
Updated on

Nanded News : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं बीड जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला.या हत्येचा मुद्दा उचलून धरत विरोधकांनी हिवाळी अधिवेशनात सरकारला धारेवर धरले.तर प्रत्युत्तरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हत्येप्रकरणी सखोल चौकशीचे आदेश दिले असून कुणालाही सोडणार नसल्याची ग्वाही भरसभागृहात दिली.मात्र,आता याप्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मोठी मागणी केली आहे.

बीडच्या घटनेवरुन मंत्री धनंजय मुंडेंचा (Dhananjay Munde) राजीनामा मागितला आहे. या घटनेत आमदार सुरेश धस यांनी अधिवेशनात केलेल्या गंभीर आरोपानंतर राजकीय वातावरण आणखीच तापलं आहे. त्यातच राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हेच या हत्येमागचे मास्टर माईंड असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून केला जात आहे. त्याचमुळे नाना पटोले यांनी थेट धनंजय मुंडे यांची मंत्रि‍पदाचा राजीनामा मागितला आहे

नांदेड येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागतानाच अजित पवारांचा दाखलाही दिला. ते म्हणाले, अजित पवारांवर ज्यावेळेला आरोप झाले. तेव्हा त्यांनादेखील मंत्रिमंडळातून बाहेर काढण्यात आले होते.आता मुख्यमंत्री आणि अजित पवारांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेत त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढून या प्रकरणाची चौकशी झाली तरच देशमुख यांना न्याय मिळेल,असंही पटोले यांनी यांनी सांगितले.

नाना पटोले म्हणाले, वाल्मिक कराड हा माफिया आहे.मस्साजोग प्रकरणात सत्ताधारी पक्षातील आमदारांनी देखील सत्य परिस्थिती सांगितली होती.पण,मुख्यमंत्र्यांनी टाइमपास केला,माफियाला ताकद देण्याचं काम केलं.आता मुंडे यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढावं आणि या प्रकरणाची चौकशी करावी,असं पटोले यांनी सांगितलं.

बीड प्रकरणावरून मराठा क्रांती मोर्चा ही संघटना आक्रमक झाली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, कराडच्या व्यवहारांची 'ईडी'तर्फे चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आली आहे. एवढंच नाहीतर जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाही. तोपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात मराठा क्रांती मोर्चाकडून निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

याशिवाय मराठा क्रांती मोर्चाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रत्येक कार्यक्रमांमध्ये निदर्शनं करणार असल्याचं जाहीर केलं आहे. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, बीडच्या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु आहे. दोन्ही प्रकारात आम्ही चौकशी करत असून यामध्ये जो कोणीही दोषी आढळेल त्याला सोडलं जाणार नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारची निदर्शने करणे हे योग्य होणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com