Nanded : अशोक चव्हाण खोटं बोलण्यात नंबर एक, आता राजशिष्टाचार पाळला जाईल..

५० वर्षात त्यांच्या घरात सत्ता असूनही विकास झाला नाही, हे खेदाने नमूद करावे लागेल. गेल्या अडीच वर्षात सत्ता असूनही काहीच केले नाही. (MP Pratap Patil Chikhlikar)
Ashok Chavan-Pratap Patil Chikhlikar,Nanded
Ashok Chavan-Pratap Patil Chikhlikar,NandedSarkarnama
Published on
Updated on

नांदेड : गेल्या अडीच वर्षात महाआघाडी सरकारमुळे जनतेला मोठ्या प्रमाणावर त्रास झाल्यामुळेच हे सरकार घरी बसवले आहे. (Nanded) त्याचबरोबर जनतेला त्रास होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले आहे, असा दावा भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) यांनी केला. नांदेड उत्तरचे शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांना कोणी गावबंदीचा इशारा देत असेल तर नांदेडमध्ये गावबंदी करण्यासाठी कोणी जन्मलेला नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला.

राज्यात शिंदे - फडणवीस यांचे सरकार आल्याबद्दल भाजपच्या वतीने खासदार चिखलीकर यांच्याउपस्थितीत रविवारी सकाळी दुचाकी फेरी काढण्यात आली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत चिखलीकर यांनी नव्या सरकारबद्दल भाष्य केले. अशोक चव्हाण (Ashok Chavan) खोटं बोलण्यात एक नंबर आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

चिखलीकर म्हणाले, नांदेड जिल्ह्यात भाजपचे चार आणि शिंदे गटाचे एक असे पाच आमदार असून त्यापैकी एकाला मंत्रीपदाची संधी द्यावी तसेच भाजपचा पालकमंत्री असावा, अशी मागणी आपण पक्षश्रेष्ठींकडे करणार असून पक्ष जो आदेश देईल तो मान्य राहील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही भाजपला आणखी चांगली बळकटी येईल, असा मला विश्वास आहे.

नांदेड महापालिकेची निवडणुक तोंडावर असून कॉँग्रेसने खड्डे खोदणे व रस्ते करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे हे रस्ते खरोखरच गरजेचे होते का? याचीही तपासणी करावी लागेल. गेल्या ५० वर्षात त्यांच्या घरात सत्ता असूनही विकास झाला नाही, हे खेदाने नमूद करावे लागेल. गेल्या अडीच वर्षात सत्ता असूनही काहीच केले नाही, असा टोला चिखलीकरांनी पालकमंत्री राहिलेल्या अशोक चव्हाण यांनी लगावला.

नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीबाबतही आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असून नाशिकप्रमाणेच या बैठकीलाही स्थगिती मिळेल. महापालिका व जिल्ह्यातील दलित वस्तीच्या निधीबाबतही केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांच्याकडे तक्रारीचे निवेदन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Ashok Chavan-Pratap Patil Chikhlikar,Nanded
Osmanabad : सावंतांना हुकलेले मंत्रीपद मिळणार ? राणा पाटलांचे पक्षांतर आता फळाला येणार..

न मागता समर्थनाला किंमत नाही..

२०१९ मध्ये निवडणुका झाल्यानंतर लोहा कंधारचे शेकापचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी भाजप - सेना सरकारला पाठिंबा दिला होता. नंतर महाविकास आघाडीचे सरकार आले त्यांना पाठिंबा दिला. आता पुन्हा भाजपची सत्ता आली की समर्थन दिले असल्याबाबत विचारले असता चिखलीकर म्हणाले , सत्ता आली की उगवत्या सुर्याला नमस्कार करणारे अनेकजण असतात. न मागता समर्थन दिले असेल तर त्याला फार किंमत राहत नाही.

लेंडी धरणाच्या संदर्भातील पुर्ऩवसनाच्या प्रश्नावर अशोक चव्हाण यांनी फक्त आश्वासनेच दिली. खोटे बोलण्यात ते राज्यात क्रमांकवर एकवर आहेत. देगलूरच्या पोटनिवडणुकीच्या वेळी त्यांनी आश्वासन देऊन नंतर फसवणुक केल्याचेही ते म्हणाले. गेल्या अडीच वर्षाच्या काळात नांदेड जिल्ह्यात राजशिष्टाचार पाळला गेला नव्हता. खासदारांचे नाव कुठेही येणार नाही, याची सत्ताधारी मंडळी दक्षता घेत होती.

मात्र, आता शिंदे - फडणवीसांचे सरकार आले असून राजशिष्टाचार पाळला जाईल. अवैध धंदेही बंद झाले पाहिजेत, अशा मताचा मी आहे. देवेंद्र फडणवीस हे कुण्या एका समाजाचे नेते नाहीत ते महाराष्ट्राचे नेते आहेत. गेल्या अडीच वर्षात त्यांनी भाजपचे १०६ आणि इतर आमदारांना एकत्र ठेवले. राज्यात पक्ष संघटन मजबूत केले.

राजकारणात पाठीत खंजीर खुपसणारे खूप पाहिले आहेत. पण मुख्यमंत्रीपद मिळत असताना देखील पक्षाच्या आदेशानुसार उपमुख्यमंत्री झाले. माझ्या आयुष्यात देवेंद्र फडणवीस यांच्यासारखी व्यक्ती पाहिली नाही. सगळ्यांनाच अनपेक्षीत धक्का होता. पक्ष जो आदेश देईल, ते मान्य करणारे आम्ही आहोत, असेही चिखलीकर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com