Osmanabad : सावंतांना हुकलेले मंत्रीपद मिळणार ? राणा पाटलांचे पक्षांतर आता फळाला येणार..

तानाजी सावंत फडणवीसांच्याच मंत्रीमंडळात केबिनेट मंत्री होते, महाविकस आघाडी सरकारमधल्या ठाकरे सरकारमध्ये मात्र त्यांना संधी मिळाली नव्हती. (Osmanabad)
Mla RanaJagjeetsingh Patil-Tanaji Sawant
Mla RanaJagjeetsingh Patil-Tanaji SawantSarkarnama
Published on
Updated on

उस्मानाबाद : जिल्ह्यात शिवसेना बंडखोर आमदारांमध्ये प्रा. तानाजी सावंत यांचे नाव मंत्रिपदासाठी आघाडीवर आहे. (Osmanabad) तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक आमदार राणाजगजितसिंह पाटील (Rana Jagjeetsingh Patil) यांचेही भाजपच्या कोट्यातून नाव घेतले जात आहे. त्यामुळे जिल्ह्याला दोन मंत्रिपद मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उस्मानाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. चार पैकी तीन आमदार आणि एक खासदार जिल्ह्याने सेनेला दिला आहे. मात्र या तीन पैकी दोन आमदारांनी बंडाचा पवित्रा घेतला. यामध्ये परंडा विधानसभेचे आमदार प्राध्यापक तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचा पवित्रा कायमच आक्रमक राहिलेला आहे.

शिवसेनेमध्ये असतानाही त्यांनी शिवजलक्रांतीच्या माध्यमातून विकास कामे खेचून आणली. मात्र महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात प्रा. सावंत यांना संधी मिळाली नाही. तेव्हापासून सातत्याने कोणत्या-ना कोणत्या कार्यक्रमात त्यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षावर उघडपणे तर कधी छुप्या पद्धतीने नाराजी व्यक्त केली. शिवाय भाजपसोबत युती करावी असा आग्रही त्यांनी पक्षप्रमुखांकडे केल्याच्या चर्चा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून येत होत्या.

मात्र गेली अडीच वर्षात नाराज असलेली आमदार सावंत यांनी या बंडामध्ये प्रमुख भूमिका निभवल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बंडखोर शिवसेनेच्या कोट्यातून त्यांना मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जर त्यांना मंत्रिमंडळ बाहेर ठेवले तर ते पुन्हा उघडपणे बोलायला कमी करणार नाहीत, याची धास्ती शिंदे गटाला आहे. त्यामुळे त्यांचं मंत्रीपद हे निश्चित मानलं जात आहे.

तर दुसरीकडे आमदार राणा जगजितसिंह पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक मानले जातात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडत आमदार पाटील यांनी पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांनाच त्या परिस्थितीत आव्हान दिले होते. त्यामुळे खासदार पवार यांनी त्यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. हे सर्वश्रुत असल्याने आमदार पाटील यांनी फडणवीस यांच्यासोबत चांगली जवळीक साधली आहे.

Mla RanaJagjeetsingh Patil-Tanaji Sawant
रामशास्त्री आता जागा झाला; बाळासाहेब थोरातांचा राज्यपालांचा टोला

जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची फारशी ताकद नाही. त्यामुळे आमदार पाटील यांना बळ देण्यासाठी मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करावा, अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यातून होत आहे. जिल्ह्यात केवळ चारच आमदार आहेत. अगदी छोटा जिल्हा असला तरी या ठिकाणातून दोन आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची चर्चा सध्या कार्यकर्त्यांमध्ये जोरात सुरू आहे.

तानाजी सावंत फडणवीसांच्याच मंत्रीमंडळात केबिनेट मंत्री होते, महाविकस आघाडी सरकारमधल्या ठाकरे सरकारमध्ये मात्र त्यांना संधी मिळाली नव्हती. तर २०१९ मध्ये मोठ्या आशेने भाजमध्ये प्रवेश केलेले राणाजगजीतसिंह पाटील हे शिवसेना-भाजप युतीला बहुमत मिळून देखील मंत्रीपदापासून वंचित राहिले होते. महाविकास आघाडी झाल्याने त्यांचे पक्षांतर फसले होते. आता अडीच वर्षांनी का होईना, त्यांचे पक्षांतर फळाला येते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com