
Nanded News : मराठवाड्यातील प्रमुख जिल्ह्यांपैकी एक असलेल्या नांदेडमध्ये 19 वर्षांपूर्वी बॉम्बस्फोटाची खळबळजनक घटना घडली होती.या घटनेत 2 जणांचा मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी झाले होते. आता या प्रकरणी न्यायालयाचा तब्बल 19 वर्षानंतर निकाल दिला आहे. या निकालात कोर्टानं सीबीआयलाच(CBI) मोठा दणका दिला आहे.
नांंदेड शहरातील पाटबंधारेनगर भागात 6 एप्रिल 2006 रोजी घडलेल्या बाँबस्फोट प्रकरणातील सर्व 10 आरोपींची शनिवारी (ता. 4) न्यायालयाने (Court) निर्दोष सुटका केली. या प्रकरणाचा निकाल 19 वर्षांनंतर लागला असून सीबीआयला मोठा झटका बसला आहे.
या स्फोटात नरेश राजकोंडवार व हिमांशू पानसे यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर, चार जण गंभीर जखमी झाले होते. प्रारंभी स्फोट फटाक्यांचा असल्याचे सांगितले जात होते. मात्र, तपासादरम्यान बाँबस्फोट असल्याचे समोर आले. प्रकरणाची जबाबदारी एटीएसकडून सीबीआयकडे वर्ग करण्यात आली होती.
पाटबंधारेनगर भागातील लक्ष्मण राजकोंडवार यांच्या घरात झालेल्या या स्फोटामुळे घरातील साहित्य आणि इमारत उद्ध्वस्त झाली होती. तपासादरम्यान, स्फोटाचा संबंध परभणी, जालना आणि पूर्णा येथील बाँबस्फोटांशी असल्याचे पुढे आले.
सीबीआयने सुमारे दोन हजार पानांची चार्जशीट दाखल करत १२ जणांना आरोपी ठरवले होते. जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश सी.व्ही. मराठे यांच्या खंडपीठाने खटल्यात ४९ साक्षीदार तपासले. मात्र, सीबीआय स्फोटाचा ठोस पुरावा न्यायालयात सादर करू शकली नाही.
यामुळे न्यायालयाने हा स्फोट फटाक्यांचा होता, असे मान्य करत सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले. बचाव पक्षाचे वकील अॅड. नितीन रुणवाल, अॅड. चंद्रकांत पत्की, अॅड. आर.सी. बाहेती यांनी आरोपींची बाजू प्रभावीपणे मांडली. न्यायालयात सुनावणीसाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. निकालाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.