Nanded Lok Sabha Constituency : नांदेडमध्ये वडील, मुलगा अन् जावई; 30-35 वर्ष एकाच कुटुंबाची सत्ता..

Congress News : राजकारणात घराणेशाहीचा मुद्दा कायमच चर्चेत असतो, यावर आम्ही त्यातले नाही `पार्टी विथ डिफरन्स` म्हणवणाऱ्या पक्षात तीच परंपरा सुरू आहे.
Shankrrao chavan, ashok chavan, bhaskrrao patil Khatgavkar
Shankrrao chavan, ashok chavan, bhaskrrao patil Khatgavkar Sarakrnama
Published on
Updated on

Nanded News : मराठवाड्यातील काँग्रेसचा मजबूत गड म्हणून ओळख असणाऱ्या लोकसभेच्या नांदेड मतदारसंघाची चर्चा यावेळी विविध कारणांनी होत आहे. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून ते आताच्या 2024 पर्यंत सर्वाधिकाळ सत्ता आणि विजय काँग्रेस पक्षाने मिळवलेला आहे. राजकारणात घराणेशाहीचा मुद्दा कायमच चर्चेत असतो, यावर आम्ही त्यातले नाही `पार्टी विथ डिफरन्स` म्हणवणाऱ्या पक्षात तीच परंपरा सुरू आहे. त्यामुळे आता निवडणुकांमध्ये नात्यागोत्यातील व्यक्तीला उमेदवारी देण्याचा मुद्दा नवा राहिलेला नाही.

नांदेड मतदारंसघाचा विचार केला तर 1957 ते 2019 पर्यंत झालेल्या सोळा लोकसभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस (Congress), काँग्रेस (आय), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे एकाच पक्षाने तब्बल अकरावेळा विजय मिळवला आहे. यातील सात टर्म म्हणजे साधरणता 30-35 वर्ष एकाच कुटुंबाची किंवा त्यांच्या सग्यासोयऱ्यांच्या हाती येथील सत्ता होती. (Nanded Lok Sabha Constituency News)

Shankrrao chavan, ashok chavan, bhaskrrao patil Khatgavkar
Mohol News : मोठी बातमी : कोर्टाचा माजी आमदार रमेश कदम, शरद कोळींसह 72 जणांना मोठा दणका; सुनावली 'ही' शिक्षा

दिवंगत काँग्रेस नेते माजी मंत्री शंकरराव चव्हाण (Shankarrao Chavan) हे स्वतः दोनवेळा नांदेड लोकसभा मतदारसंघातून निवडून गेलेले आहेत. तर त्यांचे सुपूत्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) जे आता भाजपचे (BJp) राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व काँग्रेसमध्ये असताना केले. त्यानंतर शंकरराव चव्हाणांचे जावई आणि अशोक चव्हाणांचे भावजी भास्कर पाटील खतगावकर (Bhaskar Patil) यांनी याच नांदेड मतदारसंघातून तीन वेळा विजय मिळवत दिल्लीत प्रतिनिधित्व केले.

लोकसभेपासून सुरु असलेली ही परंपरा पुढे विधानसभा निवडणुकीतही दिसली. अशोक चव्हाण लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेल्यावर त्यांच्या पत्नी अमिता देशमुख यांनी भोकर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. आता चव्हाण कुटुंबाची तिसरी पिढी म्हणजे अशोक चव्हाणांची कन्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भोकरमधून आपल्या राजकीय करिअरची सुरुवात करण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एकूणच काय तर नांदेड लोकसभा असो की भोकर विधानसभा सबकुछ चव्हाण हे चित्र दिसते. आपल्या राजकीय जीवनातील सर्वाधिक काळ आणि महत्वाची सत्ता पदे काँग्रेस पक्षात भोगल्यानंतर अशोक चव्हाण यांनी काही महिन्यापुर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. या बदल्यात पक्षाने त्यांना राज्यसभेची खासदारकी आणि नांदेड लोकसभा मतदारसंघातून मावळते खासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांना निवडून आणण्याची जबाबदारी सोपवली.

काँग्रेस पक्षात घराणेशाहीची परंपरा नांदेडमध्ये चालवणाऱ्या चव्हाण यांनी स्वार्थासाठी भाजपचे कमळ हाती घेतले, असा आरोप त्यांच्यावर निष्ठावंत काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांकडून केला जातो. या पार्श्वभूमीवर होत असलेल्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महायुतीने प्रताप पाटील चिखलीकरांना उमेदवारी दिली, तर काँग्रेस महाविकास आघाडीने अशोक चव्हाण यांच्याच मार्गदर्शनाखाली काम केलेल्या वसंत चव्हाण यांना मैदानात उतरवले आहे.

Shankrrao chavan, ashok chavan, bhaskrrao patil Khatgavkar
Hingoli Lok Sabha Constituency : हिंगोलीचे मतदार मोठ्या मनाचे, पण गद्दारी खपवून घेत नाहीत..

अशोक चव्हाण यांच्यामुळे नांदेडची जागा हमखास निवडून येणार, असा दावा केला जातोय. मात्र, जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती आणि विविध संस्थांनी केलेल्या सर्व्हेतून नांदेडमध्ये आश्चर्यकारक निकाल लागून वसंत चव्हाण निवडून येतील, असे बोलले जाते. त्यामुळे असे झाले तर हा निकाल स्वार्थासाठी पक्ष सोडून जाणाऱ्यांना एक धडा ठरेल.

त्याशिवाय अशोक चव्हाण यांच्यासह भाजपच्या प्रतिष्ठेलाही धक्का पोचेल. एकूणच ज्या काँग्रेसने सर्वाधिक काळ नांदेड लोकसभा मतदारसंघावर अधिराज्य गाजवले, तोच नांदेडचा गड आता अशोक चव्हाण यांच्यावर भाजपसाठी जिंकण्याची वेळ आली आहे.

(Edited by : Sachin Waghmare)

Shankrrao chavan, ashok chavan, bhaskrrao patil Khatgavkar
Ashok Chavan News : अशोक चव्हाण यांची स्वप्नपूर्ती, जालना- नांदेड समृद्धी महामार्गाबाबत मोठी बातमी आली समोर

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com