Mohol News : मोठी बातमी : कोर्टाचा माजी आमदार रमेश कदम, शरद कोळींसह 72 जणांना मोठा दणका; सुनावली 'ही' शिक्षा

Shivsena News : माजी आमदार रमेश कदम व ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी या दोघांनी मिळून प्रशासनाच्या विरोधात मोर्चा काढला होता. त्यासोबतच थेट जेसीबीद्वारे लावण्यात आलेली जाळी तोडली होती.
Ramesh kadam, Sharad koli
Ramesh kadam, Sharad koli Sarkarnama

Solapur News : मोहोळ शहरातील उड्डाणपुलाखाली 2015 साली छोट्या व्यापाऱ्यांना बसण्यासाठी प्रशासनाकडून विरोध करण्यात आला होता. व्यापाऱ्यांनी तेथे बसू नये म्हणून त्या भागात प्रशासनाने जाळी लावली होती. या लावलेल्या जाळीला माजी आमदार रमेश कदम आणि ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी कडाडून विरोध केला होता.

या दोघांनी मिळून प्रशासनाच्या विरोधात मोर्चा काढला होता. त्यासोबतच थेट जेसीबीद्वारे लावण्यात आलेली जाळी तोडली होती. या प्रकरणी न्यायालायने सोमवारी निकाल दिला असून या प्रकरणी माजी आमदार रमेश कदम (Ramesh Kadam) व ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी (Sharad Koli) यांच्यासह 72 जणांना न्यायालयाने एका महिन्याची शिक्षा ठोठावली. त्यासोबतच एका महिन्याचा कारावास व एक हजार रुपये दंड, अशी शिक्षा कोर्टाने सुनावली आहे. (Ramesh Kadam News)

Ramesh kadam, Sharad koli
Hingoli Lok Sabha Constituency : हिंगोलीचे मतदार मोठ्या मनाचे, पण गद्दारी खपवून घेत नाहीत..

न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेचा खटला साधारण 9 वर्षे जुना आहे. 2015 सालच्या एका प्रकरणात न्यायालयाने हा निकाल दिला आहे. साधारण नऊ वर्षांपर्वी मोहोळ तेथील उड्डाण पुलाखालील जाळी तोडल्याप्रकरणी, पोलीस ठाण्यावर मोर्चा काढल्याप्रकरणी त्याच्याविरोधात हा गुन्हा दाखल झाला होता.

सर्वसामान्य कष्टकरी आणि कामगारांसाठी आम्ही तुरुंगात गेलो तरी आम्ही बोलत राहणार. अशा प्रकरणात आम्ही आवाज उठवत राहणार, अशी प्रतिक्रिया रमेश कदम यांनी याप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर प्रसारमाध्यमाशी बोलताना दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या प्रकरणात 72 जणांना करण्यात आले होते आरोपी

मोहोळ शहरातील उड्डाणपुलाखाली 2015 साली छोट्या व्यापाऱ्यांना बसण्यासाठी प्रशासनाकडून विरोध केला होता. त्या भागात व्यापाऱ्यांनी बसू नये यासाठी प्रशासनाने जाळी लावली होती. त्यामुळे या प्रकाराला विरोध करत त्यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चादेखील काढला होता. याच प्रकरणात रमेश कदम, शरद कोळी यांच्यासह एकूण 72 जणांना आरोपी करण्यात आले होते. रमेश कदम आणि शरद कोळी यांना एका महिन्याचा कारावास आणि 1 हजार रुपयांचा दंड ठोठवला आहे.

Ramesh kadam, Sharad koli
Ramesh Kadam News : तुरुंगातून बाहेर आलेल्या रमेश कदमांनी जाहीर केली भूमिका; लोकसभेला कुणाला पाठिंबा?

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com