Ashok Chavan : नांदेडच्या पराभवावर मंथन पण अशोक चव्हाणांचीच दांडी!

Nanded lok sabha 2024 result Analysis Raosaheb Danve Ashok Chavan : किती मते महायुतीच्या उमेदवाराला मिळाली आणि कुठल्या मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार सरस ठरला याचा आढावा रावसाहेब दानवे यांनी घेतला.
Raosaheb Danve Ashok Chavan
Raosaheb Danve Ashok Chavansarkarnama

Ashok Chavan News : लोकसभेच्या नांदेड मतदारसंघात झालेला पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतरही भाजपला नांदेडमध्ये विजय मिळवता आला नाही. या पराभवाची कारणे शोधून मंथन करण्यासाठी रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत नांदेडमध्ये भाजपची महत्वाची बैठक पार पडली. पण या बैठकीला अशोक चव्हाण गैरहजर राहिल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

अशोक चव्हाण कालच (शुक्रवारी) मुंबईला गेल्याचे सांगितले जात आहे. पक्ष निरीक्षकांच्या उपस्थिती बैठक होणार असल्याची कल्पना चव्हाण यांना देण्यात आली नव्हती का? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

रावसाहेब दानवे Raosaheb Danve यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांची शासकीय विश्रामगृहात बैठक घेऊन लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावर चर्चा केली. कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती मते महायुतीच्या उमेदवाराला मिळाली आणि कुठल्या मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार सरस ठरला याचा आढावा दानवे यांनी यावेळी घेतल्याची माहिती आहे.

Raosaheb Danve Ashok Chavan
Video Pankaja Munde : जात निहाय जनगणना झालीच पाहिजे, पंकजा मुंडेची मागणी

काँग्रेस Congress महाविकास आघाडीचे वसंत चव्हाण यांनी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा पराभव केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा घेऊनही भाजपचा पराभव झाल्याने पक्ष नेतृत्वाने याची गंभीर दखल घेतली आहे. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर मोठ्या प्रमाणात त्यांचे समर्थक पक्षात दाखल झाले होते. महिनाभर नांदेड मध्ये त्यांचे प्रवेश सोहळे सुरू होते. तरी चिखलीकरांचा पराभव झाल्याने भाजप नेत्यांना चांगलाच धक्का बसला.

अंतर्गत गटबाजीचा फटका

भाजपमधील अंतर्गत गटबाजी आणि चिखलीकर यांचे जिल्ह्यातील आपल्याच पक्षातील काही आमदारांशी बिघडलेले संबंध याचा फटकाही त्यांना बसल्याचे बोलले जाते. चिखलीकर यांनी स्वतः एक-दोनजणांनी निवडणुकीत माझे काम केले नाही, त्यांना शेवटपर्यंत सोडणार नाही, असे म्हणत टीका केली होती. त्यांचा रोख आमदार राजेश पवार, डाॅ. तुषार राठोड यांच्याकडे होता, अशी चर्चा आहे.

अहवाल केंद्रीय नेतृत्वाला पाठवणार

पक्ष निरीक्षक म्हणून आलेल्या रावसाहेब दानवे यांच्या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आजच्या (शनिवार) बैठकीचा अहवाल केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत दणका बसल्यानंतर भाजप आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे.

Raosaheb Danve Ashok Chavan
Laxman Mane : लक्ष्मण मानेंनी उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजेंना डिवचले; ‘...तर राजीनामा देऊन भाजपमधून बाहेर पडा’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com