Nanded News : अशोकराव आधी आपण ऐकमेकांच्या विरोधात लढायचो, आता एकत्र आहोत. तुम्ही सोबत आल्यामुळे माझी यंत्रणा सुस्तावली आहे. तुमच्यामुळे त्यांना माझ्या विजयाची खात्रीच झाली आहे, ही खरी गोष्ट आहे, अशी जाहीर कबुली लोकसभेच्या नांदेड मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली. पण आता झपाट्याने कामाला लागू. तुमच्या आणि माझ्या एकत्रित प्रयत्नाने नांदेडची जागा मोठ्या मताधिक्याने निवडून आणू, असेही चिखलीकर म्हणाले.
नांदेड जिल्ह्यातील नरसी येथे चिखलीकर यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा झाली. नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाच्या पार्श्वभूमीवर या सभेकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. यावेळी प्रताप पाटील चिखलीकर यांनी पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा नांदेडकरांसमोर ठेवला. काही चुक झाली असेल तर उदार मनाने माफ करा आणि मला निवडून द्या, असे आवाहन चिखलीकरांनी केले. (Latest Marathi News)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अशोक चव्हाण सोबत आल्यामुळे माझी यंत्रणा थोडी सुस्तावली आहे, अशी कबुली देत भाजपच्या चौरसौ पार मध्ये नांदेची जागा मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी झपाटून कामाला लागा. नांदेड जिल्ह्यात विकास होत आहे, पाईपलाइनमधून घरगुती गॅसचा पुरवठा करणारी योजना, राष्ट्रीय महामार्ग, रेल्वेची कामे झाली आहेत. पण आता नांदेड जिल्ह्यासाठी मोठे उद्योग आले पाहिजे, यासाठी आम्ही पुढील काळात प्रयत्न करणार आहोत.
खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) , डाॅ. अजित गोपछडे व इतर नेते मिळून आम्ही जिल्ह्यात उद्योग आणून तरुणांच्या हाताला काम मिळवून देऊ. पाच वर्षात प्रामाणिकपणे काम केले. दोनवेळा कोरोना झाला तरी जीवाची पर्वा केली नाही, जनतेला औषधी, अन्न-धान्य पुरवण्याचे काम केले. ही निवडणूक माझी नाही, मी नाममात्र आहे, मला दुसऱ्यांदा संधी दिली त्याबद्दल पक्षाचे आभार मानतो.
ही निवडणूक नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठीची आहे. मोदी है तो मुमकीन है, म्हणून आम्ही सगळे एकत्रं आलो आहोत, असेही चिखलीकर यांनी सांगितले. मला फडणवीस साहेंबाचा फोन आला होता, तुमच्या गाडीने अजून स्पीड पकडली नाही का? मी सांगितलं साहेब अशोकराव चव्हाण आल्यामुळे चिंता राहीली नाही.
माझ्या कार्यकर्त्यांना चिखलीकर निवडून आले असंच वाटत. त्यामुळे खरचं आमची यंत्रणा थोडी सुस्तावली होती. पण मी त्यांना सांगू इच्छितो की अशोक चव्हाण आपल्याविरोधात लढले होते, तेव्हाही आपण निवडणूक जिंकलो होतो. आता ते आपल्यासोबत आहेत, त्यामुळे यावेळी दुप्पट मतांनी विजय झाला पाहिजे, असे आवाहन चिखलीकर यांनी उपस्थितांना केले.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.