BJP Dinesh Sharma News : ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस एकमेकांना संपवत आहेत, भाजप नेत्याची जोरदार टीका !

Pune Lok Sabha Constituency : भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये उत्तम समन्वय ..
BJP Dinesh Sharma
BJP Dinesh SharmaSarkarnama
Published on
Updated on

Pune News : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार सुरूवात झाली आहे. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसविण्याचा संकल्प भारतीय जनता पक्षाने महायुतीच्या माध्यमातून केला आहे. यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत 'चार सौ पार' अशी घोषणा देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचा निर्धार करण्यात आला असून यासाठी भाजपने वरिष्ठ पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी देत अधिकाधिक जागांवर महायुतीचे उमेदवार कसे विजयी होतील, यासाठी रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री, राज्यसभा खासदार आणि महाराष्ट्र भाजप निवडणूक प्रभारी दिनेश शर्मा यांनी गुरूवारी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. भाजपच्या (Bjp) वरिष्ठ नेत्यांनी निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी दिल्यानंतर आतापर्यंत राज्यातील 18 लोकसभा मतदारसंघांना भेट देऊन मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला आहे. यामध्ये संपूर्ण राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच हवा आहे. मोंदीचा जनता आणि नेत्यांवर व्यापक प्रभाव असल्याचे दिसून येतो. महाराष्ट्रात सर्वत्र महायुतीचे वातावरण असून लोकसभेच्या निवडणुकीत आम्हाला निर्विवाद यश मिळेल, असा विश्वास शर्मा यांनी व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

BJP Dinesh Sharma
Sharad Pawar News : 'राज ठाकरेंच्या निर्णयात माझा काही हात नाही'; शरद पवारांची कोपरखळी!

महाविकास आघाडीतील नेते एकमेकांच्या जागांवर हक्क सांगत असून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांचे काहीही देणेघेणे त्यांना नाही. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना, शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये परिवारवाद आणि स्वतःच्या परिवाराची काळजी आहे. या उलट भाजपमध्ये मोदींच्या गॅरंटी ची नीती आहे. सर्वसामान्य जनता मोदींचा परिवार आहे. महाआघाडी मध्ये असलेल्या स्पर्धेतून उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस एकमेकांना संपवत आहेत, अशी टीका शर्मा यांनी केली.

जागा वाटपावरून महाविकास आघाडीत जोरदार स्पर्धा सुरू आहे. कोणी कोणाचे ऐकायला तयार नसल्याने आघाडीची बिघाडी झाल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. हे चित्र महायुतीमध्ये नाही. ही पहिली निवडणूक आहे जिथे राजकीय पक्ष लढत नसून जनताच निवडणूक लढत असल्याचे शर्मा म्हणाले. राज्यात सत्ताधारी म्हणून काम करणारा भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde),उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये उत्तम समन्वय आहे. विदर्भात पहिल्या टप्प्यातील पाचही जागा महायुतीचे उमेदवार लाखांच्या फरकाने एकतर्फी जिंकतील, संपूर्ण राज्यात हेच वातावरण आहे.

BJP Dinesh Sharma
Sharad Pawar Vs Ajit Pawar : अजितदादांच्या 'त्या' इमोशनल कार्डवर पवारांची 'सुपर गुगली'; 'मूळचे की बाहेरचे पवार?

गेल्या काही निवडणुका भाजप, शिवसेना एकत्र लढली आणि जिंकली. मात्र त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व आणि सनातनाचा चेहरा उतरून फेकून दिला.ते शरद पवारांच्या जाळ्यात अडकले. मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी केडर बेस्ट भाजपा, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) कार्यकर्ते कामाला लागले आहेत. ही लोकसभेची निवडणूक म्हणजे परिवारवादी आणि प्रखर राष्ट्रवाद अशी लढाई असणार आहे, असेही शर्मा म्हणाले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार माधुरी मिसाळ, शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, हे उपस्थित होते.

BJP Dinesh Sharma
Loksabha Election 2024 : पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.., राज्यातील सर्वाधिक मतदार पुण्यातच..!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com