Nanded Loksabha News : महाविकास आघाडीला संधी, पण अशोकरावांनी मनावर घेतले तर..

Congress : ज्या यशपाल भिंगेंमुळे चव्हाणांची दिल्लीत जाण्याची दुसरी संधी हुकली ते देखील बीआरएसमध्ये दाखल झाले आहेत.
Ashok Chavan-Mp Chikhlikar News, Nanded
Ashok Chavan-Mp Chikhlikar News, NandedSarkarnama

Marathwada : मोदी लाटेत नांदेड लोकसभा मतदारसंघात दणदणीत विजय मिळवत काॅंग्रेसने हा जिल्हा आपला बालेकिल्ला असल्याचे `डंके की चोट`, पर दाखवून दिले होते. माजी केंद्रीय व राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवगंत शंकरराव चव्हाण (Shankarrao Chavan) यांनी हा जिल्हा काॅंग्रेसमय केला, पुढे त्यांचा राजकीय वारसा समर्थपणे पुढे नेणाऱ्या अशोक चव्हाणांनी देखील ती परंपरा कायम ठेवली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत इच्छा नसतांना वरिष्ठांचा आदेश शिरसावंद्य मानत अशोक चव्हाणांना निवडणूक लढवावी लागली.

Ashok Chavan-Mp Chikhlikar News, Nanded
Sakal Hindu Samittee News : मंदिर वाचवायला नाही, तर स्वतःच्या बचावासाठी इम्तियाज जलील मंदिरात..

देशात आणि राज्यात मोदी लाट होती, सगळीकडे भाजपमय वातावरण असतांना विजय मिळणे शक्य नाही, असेच सगळ्यांचे मत झाले होते. परंतु (Nanded) नांदेडच्या मतदारांनी काॅंग्रेसवर विश्वास दाखवत मोदी लाटेतही विजय खेचून आणला. (Ashok Chavan) अशोक चव्हाणांनी भाजपच्या डी.बी.पाटलांचा ८१ हजार मतांनी पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला होता. महाराष्ट्रात तेव्हा काॅंग्रेसचे दोनच खासदार निवडून आले होते, तेही मराठवाड्यातून. एक अशोक चव्हाण आणि दुसरे हिंगोलीतून राजीव सातव.

२०१९ च्या निवडणुकीत देखील अशोक चव्हाण विजयाची पुनरावृत्ती करू शकले असते. परंतु वंचित आघाडीच्या उमेदवार यशपाल भिंगे यांनी तब्बल १ लाख ६६ हजार मते मिळव्याने चव्हाणांचा पराभव झाला. त्यामुळे पुन्हा लोकसभा नको, असाच काहीसा सूर चव्हाणांचा २०२४ च्या निवडणुकांच्या बाबतीत दिसतो. राज्यातील सत्तांतर आणि त्यानंतर बदलेल्या राजकीय घडामोडी पाहता महाविकास आघाडीला नांदेडमध्ये पोषक वातवरण आहे.

नुकत्याच झालेल्या पदवीधर, शिक्षकमतदारसंघ आणि कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीत आघाडीला मिळालेल्या यशामुळे नांदेडात हमखास यश मिळू शकते, अशी परिस्थिती आहे. परंतु त्यासाठी अशोक चव्हाणांनी मनावर घ्यायला हवे, म्हणजे त्यांनी स्वतः लोकसभा लढवावी असे अनेकांचे मत आहे. तर चव्हाणांना मात्र दिल्लीपेक्षा राज्याच्याच राजकारणात अधिक रस असल्याचे बोलले जाते. अशोक चव्हाण यांचे भावजी माजी खासदार भास्कर पाटील खतगांवकर यांची काॅंग्रेसमधील वापसी त्यांना लोकसभेचा उमेदवार ठरवू शकते.

परंतु वाढत्या वयामुळे ते तयार होतील का? असा देखील प्रश्न उपस्थितीत केला जात आहे. त्यामुळे लोकसभेला या दोघांपैकी एक उमेदवार असल्यास २०१४ ची पुनरावृत्ती नांदेडमध्ये होणे शक्य आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार या गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चांमुळे काहीसा संभ्रम निर्माण झाला असला तरी चव्हाणांनी यावर वारंवार स्पष्टीकरण देत या चर्चा बिनबुडाच्या असल्याचे सांगून टाकले आहे. नांदेड जिल्ह्यातील काॅंग्रेस अशोक चव्हाणांशिवाय ही कल्पनाच त्यांच्या समर्थकांना करवत नाही.

Ashok Chavan-Mp Chikhlikar News, Nanded
Sandipan Bhumre News : उद्धवसाहेबांची लय मोठी सभा झाली, साहेब आपल्याला बी घ्यावं लागलं ; कार्यकर्त्याचा हट्ट्..

शिवाय भाजपमध्ये चव्हाण जाणे म्हणजे एकाच म्यानात दोन तलवारी ठेवण्यासारखे होईल. ज्या विद्यमान भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि अशोक चव्हाणांमधून विस्तव देखील जात नाही, त्या पक्षात जाण्याचा निर्णय ते घेणार नाहीत, असे त्यांचे समर्थक ठामपणे सांगतात. त्यामुळे काॅंग्रेसमध्येच राहून भाजपला कायम विरोध करत राहणेच चव्हाण पसंत करतील असे दिसते. भाजपकडून चिखलीकर विद्यमान खासदार असल्याने पुन्हा त्यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ टाकणार हे जवळपास निश्चित आहे.

राज्यात आणि केंद्रात असलेल्या सत्तेचा लाभ चिखलीकरांनी बऱ्यापैकी जिल्ह्यातील रस्ते व रखडलेल्या कामांना गती देण्यासाठी करून घेतला आहे. असे असले तरी शिवसेना-राष्ट्रवादीच्या मदतीने काॅंग्रेस नांदेडचा किल्ला सर करेल असे दिसते. नांदेड लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभांपैकी देगलूर, दक्षिण नांदेड आणि भोकरमध्ये काॅंग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. तर नायगाव, मुखेड भाजपकडे आणि नांदेड उत्तर शिंदेच्या शिवसेनेकडे आहे.

Ashok Chavan-Mp Chikhlikar News, Nanded
Sanjay Shirsat On Sushma Andhare : सुषमा अंधारे यांच्याबद्दल प्रश्न विचारू नका, माझ्यासासाठी तो विषय संपला..

राष्ट्रवादीची जिल्ह्यात ताकद कमी असली तरी ठाकरेंच्या सहानुभूतीचा लाभ आणि काॅंग्रेसचे मजबुत संघटन या बळावर नांदेडात कमबॅक करण्याची संधी आहे. नव्यानेच दाखल झालेल्या तेलंगणाच्या बीआरएसची एन्ट्री काॅंग्रेससाठी काहीशी डोकेदुखी ठरू शकते. परंतु हा पक्ष अगदीच नवखा आहे, राष्ट्रवादीचे माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, ज्या यशपाल भिंगेंमुळे चव्हाणांची दिल्लीत जाण्याची दुसरी संधी हुकली ते देखील बीआरएसमध्ये दाखल झाले आहेत.

त्यांचा उपद्रव रोखण्याचे आवाहन देखील काॅंग्रेससमोर असणार आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नांदेड जिल्ह्यातून गेली होती, त्याचा प्रभाव अजूनही कायम आहे. या शिवाय केंद्रातील मोदी सरकारने ज्या पद्धतीने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली, त्याबद्दल जिल्ह्यातील काॅंग्रेसच्या मतदारांमध्ये संताप आहे. तो संताप येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतांच्या रुपाने बाहेर पडू शकतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com