Nanded Market Committee : जुन्यांना घरचा रस्ता दाखवत चव्हाणांची नव्या चेहऱ्यांना पंसती..

Congress : आता याचा फटका महाविकास आघाडीच्या पॅनेलला बसतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Nanded Market Committee News
Nanded Market Committee NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : नांदेड बाजार समितीवरची (Nanded Market Committee) सत्ता कायम ठेवण्यासाठी काॅंग्रेस नेते अशोक चव्हाण यांना यावेळी काही कठोर निर्णय घ्यावे लागले. उमेदवारी अर्ज दाखल करतांनाच त्यांनी जुन्या संचलाकांना थांबण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे आपल्या पुन्हा संधी मिळेल या आशेवर असलेल्या १३ पैकी ८ जणांना चव्हाणांनी डिच्चू दिला. त्यांच्याऐवजी नव्या चेहऱ्यांना पसंती देत त्यांनी त्यांची उमेदवारी कायम ठेवली.

Nanded Market Committee News
Bhokar Market Committee : ठाकरेंच्या शिवसेनेला भोकरमध्ये चव्हाणांनी दाखवला बाहेरचा रस्ता..

नव्या चेहऱ्यांना संधी देत कायम सत्तेत असलेल्यांना मात्र यावेळी चव्हाणांनी ब्रेक लावल्याची चर्चा आहे. (Nanded) नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसने एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्या चेहऱ्यांना संधी दिल्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांनी भाकरी फिरविली असे म्हणावे लागेल. (Ashok Chavan) एवढेच नाही तर तेरा पैकी आठ नवे चेहरे व इतर जागांवर आयाराम-गयारामांची देखील लाॅटरी लागली आहे.

चार विद्यमान संचालकांना डिच्यू देण्यात आला आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत चव्हाणांनी ही खेळी केल्याचे बोलले जाते. (Marathwada) विद्यमान संचालक माजी सभापती बी.आर. कदम, पप्पु पाटील कोंढेकर, आनंदराव कपाटे, अनिता क्षिरसागर यांना उमेदवारी नाकारण्यात आली. तर जिल्हा सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, निळकंठ मदने, ज्ञानेश्वर राजेगोरे, गायत्री गजानन कदम, यांना प्रथमच संधी देण्यात आली आहे.

तर माजी सभापती श्यामराव पाटील टेकाळे यांना एका निवडणुकीच्या ब्रेकनंतर पुन्हा उमेदवारी दिली आहे. भाजप मधुन स्वगृही आलेले माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, सदाशिवराव देशमुख, निलेश देशमुख, गांधी पवार यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. या नव्या-जुन्याच्या प्रयोगात अनेकांची नाराजी ओढावून घेण्यात आली आहे. आता याचा फटका महाविकास आघाडीच्या पॅनेलला बसतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

जिल्ह्यातील पाच कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू असली तरी सर्वांच्या नजरा नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीकडे लागल्या आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने माजी अशोक चव्हाण व भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. या बाजार समितीवर गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसची सत्ता राहिली आहे. यंदाच्या निवडणुकीत चमत्कार करण्याच्या तयारीत युतीचे नेते असले तरी त्यांना बरीच महेनत करावी लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com