Nanded Mayor News : नांदेडमध्ये महापौर पदासाठी आठव्यांदा महिलेला संधी मिळणार; अशोक चव्हाण कोणाला संधी देणार?

Nanded Mayor News latest update : नांदेडमध्ये महापौर पदासाठी आठव्यांदा महिलेला संधी मिळणार. अशोक चव्हाण कोणाला संधी देणार? सविस्तर वाचा.
Ashok Chavan
Ashok Chavan
Published on
Updated on

Municipal Corporation News : नांदेड महापालिकेचे महापौर पद हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाले. त्यामुळे आठव्यांदा महापौर पदावर महिलेला संधी मिळणार आहे. खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या या निवडणुकीत भाजपने स्वबळावर 45 जागांसह बहुमत मिळवले आहे. सहाजिकच नांदेडचा महापौरही अशोक चव्हाण हेच ठरवणार आहे. नांदेड-वाघाळा महापालिकेत 26 महिला नगरसवेक निवडून आल्या आहेत. यामध्ये भाजपच्या 12 महिलांचा समावेश आहे.

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठीची आरक्षण सोडत काल जाहीर झाली.नांदेड-वाघाळा शहर महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. त्यामुळे महापालिकेत बहुमत असलेल्या भारतीय जनता पक्षात महापौरपदासाठी आता मोठी चुरस निर्माण झाली आहे. नांदेड महापालिकेत एकूण 26 नगरसेविका निवडून आल्या आहेत.

Ashok Chavan
School Holiday : पुण्यानंतर आता 'या' जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या अन् परवा सुट्टी जाहीर; वाचा काय आहे नेमकं कारण?

त्यापैकी 12 महिला सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातून भाजपच्या तिकिटावर विजयी झाल्या आहेत. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार, सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव पदावर आरक्षित प्रवर्गातील महिला नगरसेविकाही दावा करू शकतात. परंतु सर्वसाधारण प्रवर्गातील महिलाच महापौरपदी बसणार हे मात्र निश्चित आहे. महापौरपदासाठी निकाल लागल्यापासूनच इच्छुकांकडून फिल्डिंग लावण्यात येत आहे.

महापौरपदाची मागणी पक्षाकडे भाजपमधून निवडून आलेल्या सर्वच 12 महिलाही करू शकतात. मात्र, कविता मुळे, ज्योती कल्याणकर, शांभवी साले व वैशाली देशमुख या चार महिलांपैकीच एकाला संधी मिळेल, अशी शक्यता भाजपच्या गोटातून वर्तविण्यात आली आहे. त्यासाठी पक्षश्रेष्ठीकडे जोरदार मागणी केली जात आहे. नांदेडच्या महापौरपदी कुणाला बसवायचे याचा निर्णय भाजप नेते खासदार अशोक चव्हाण हेच घेतील.

महापौरपदाचे आरक्षण जाहीर होताच खासदार चव्हाण यांनी दुपारी महापालिकेत तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत सर्व इच्छुक उमेदवारांशी चर्चा करून नव्या-जुन्यांचा समन्वय साधत महापौर निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. महापौरपदाच्या दावेदारांच्या यादीमध्ये कविता मुळे, ज्योती कल्याणकर, शांभवी प्रवीण साले, वैशाली देशमुख, कविता गड्डम, सदिच्छा सोनी, सुदर्शना खोमणे, रुची भारतीया, अमृता ठाकूर, मनप्रीत कौर कुंजीवाले, अनुराधा काळे, सुवर्णा बसवदे यांची नावे आघाडीवर आहेत.

गटनेतेपदाची निवड, महापौरपदावर चर्चा

दरम्यान, सोमवारी सकाळी नांदेड महापालिकेतील भाजपच्या गटनेतेपदाची निवड करण्यात आली असून, ॲड. महेश कनकदंडे यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 26 जानेवारीनंतर नांदेडचा नवा महापौर कोण होणार? हे स्पष्ट होणार आहे. नांदेड–वाघाळा महानगरपालिकेच्या स्थापनेपासून आजपर्यंत तब्बल 14 जणांना महापौरपदाची संधी मिळाली असून, यामध्ये सात महिलांनी महापौरपद भूषवून इतिहास रचला आहे.

Ashok Chavan
Mulshi Election : भुगाव गणात 'हाय होल्टेज' लढत, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत बंडखोरी; अनिल पवारांच्या हाती 'मशाल', करंजावणेंकडे 'तुतारी'

यापूर्वी महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर होण्याचा मान मंगला महादेव निमकर यांना मिळाला होता. 2002 ते 2005 या कालावधीत अ. शमीम बेगम अ. हफीज या नांदेडच्या महापौर राहिल्या. त्यानंतर शैलजा किशोर स्वामी (2015-2017), शीलाबाई किशोर भवरे (2017 ते 2019), दीक्षा कपिल धबाले (2019-2020), मोहिनी विजय येवनकर (2020-2021) आणि जयश्री नीलेश पावडे यांनी 13 ऑक्टोबर 2021 ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत महापौरपदाची जबाबदारी सांभाळली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com