Pratap Patil Chikhlikar News : अंबादास दानवेंनी वायफळ बडबड करू नये; खासदार प्रताप पाटील चिखलीकर संतापले...

Maharashtra Politics : अंबादास दानवे म्हणाले होते की, राहुल नार्वेकर न्यायिक भूमिकेत आहे.
Ambadan Danve, pratap patil chikhlikar Attack
Ambadan Danve, pratap patil chikhlikar AttackSarkarnama
Published on
Updated on

Nanded : शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुनावणी सुरू असताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गंभीर आरोप केला आहे. "राहुल नार्वेकर हे भाजप नेते आहेत. विधानसभा अध्यक्षपद हे निष्पक्षपणे काम करण्याची जागा असली तरी ते सध्या राजकीय हेतूने काम करत आहेत. नार्वेकर हे सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे नाहीत," अशा शब्दांत दानवे यांनी टीका केली आहे. दानवेंंच्या या विधानाचा नांदेडचे भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

"सध्या राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर हे न्यायमूर्तीच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी वायफळ बडबड करू नये," असे मत खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केले आहे. शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष दिरंगाई करत असल्याची टीका दानवे यांनी केल्यानंतर खासदार चिखलीकर यांनी दानवे यांना हे प्रत्युत्तर दिले आहे.

Ambadan Danve, pratap patil chikhlikar Attack
Pankaja Munde News: निर्णय घेण्याच्या तयारीत असलेल्या पंकजाताईंना राष्ट्रवादीकडून पुन्हा ऑफर; तर त्यांचं स्वागत करू...

अंबादास दानवे म्हणाले होते की, राहुल नार्वेकर न्यायिक भूमिकेत आहे. मात्र, ते न्यायिक भूमिका विसरले. मे महिन्यात न्यायालयाने भूमिका स्पष्ट केली. मात्र, सप्टेंबर महिना संपत आला असून पहिली सुनावणी झाली. न्याय उशिरा मिळणे म्हणजे, अन्याय असतो. विधानसभा अध्यक्ष वकील आहेत. त्यांना सर्व ज्ञान आहे. राजकीय हेतूने प्रेरित होऊन अध्यक्षांच्या खुर्चीवर बसून असं करणं लोकशाहीसाठी घातक आहे.

आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्याचे भिजत घोंगडे ठेवल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने कडक ताशेरे ओढल्यानंतर या मुद्द्यावर सुनावणी झाली आहे. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळातील मध्यवर्ती सभागृहामध्ये नुकतीच सुनावणी झाली. या सुनावणीसाठी ठाकरे गटाच्या १४, तर शिंदे गटाच्या ३९ आमदारांना नोटीस पाठवण्यात आली होती.

सुनावणीदरम्यान विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटाच्या आमदारांची बाजू ऐकून घेतली. त्यानंतर पुढील सुनावणी १३ ऑक्टोबर रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. १३ ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी झाल्यानंतर पुन्हा हिवाळी अधिवेशन असल्याने डिसेंबरमध्ये सुनावणी घेणं शक्य नाही. परिणामी आमदार अपात्रतेचा निकाल लागण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.

Edited By : Mangesh Mahale

Ambadan Danve, pratap patil chikhlikar Attack
Prasad Lad News : रोहित पवारांना अजितदादा योग्य वेळी उत्तर देतील; आमदार प्रसाद लाडांनी फटकारले, टीआरपी वाढवण्यासाठी...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com