Nanded NCP News: नांदेडची राष्ट्रवादी मोठ्या साहेबांसोबतच, काहींचे तळ्यात-मळ्यात..

MLAs With Sharad Pawar: आपल्या रक्ताचा थेंब न थेंब अजितदादा यांच्यासाठी यापुढेही राहणार असल्याचे वाडीकर यांनी सांगितले.
Sharad Pawar, NCP News
Sharad Pawar, NCP NewsSarkarnama

Marathwada : अजित पवार यांनी रविवारी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर नांदेड जिल्ह्यातही या भूकंपाचे धक्के जाणवले. (Nanded Ncp News) नांदेड शहर आणि जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बऱ्यापैकी वर्चस्व असले तरी बहुतांशी नेतेमंडळी ही ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मानणारी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नेतेमंडळी आणि कार्यकर्ते सध्या तरी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी सोबतच असल्याचे चित्र आहे. काहींनी मात्र अद्याप भूमिका स्पष्ट केली नसून त्यांची `वेट ॲण्ड वॉच`ची भूमिका असल्याचे दिसून आले.

Sharad Pawar, NCP News
Satish Chavan With Pawar News : काल गैरहजर, आज सत्काराला हजर ; चव्हाण, काळे अजित पवारांसोबतच..

राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यापासून (Nanded) नांदेड जिल्ह्यात ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांना मानणारा आणि त्यांच्यासोबत असलेला मोठा वर्ग आहे. त्यात ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री कमलकिशोर कदम यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. नांदेड जिल्ह्यात कधी काळी राष्ट्रवादीचे तीन-चार आमदार निवडून यायचे. त्यामध्ये कमलकिशोर कदम, वसंत चव्हाण, प्रदीप नाईक, शंकरअण्णा धोंडगे, बापूसाहेब गोरठेकर आदींचा समावेश असयाचा.

पवार यांच्यासोबत राहिलेल्या माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील आणि माजी राज्यमंत्री डॉ. माधव किन्हाळकर हे सध्या भाजपसोबत आहेत. (Marathwada) माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मानणाऱ्यापैकी प्रताप पाटील चिखलीकर यांचा आणि शिवाजी वाडीकर यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. पुढे चिखलीकरांनी राष्ट्रवादीला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला आणि आमदार झाले.

मात्र, त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि खासदार झाले. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका आणि पंचायत समितीच्या माध्यमातून राष्ट्रवादीची ताकद बऱ्यापैकी आहे. सध्या जिल्ह्यात राष्ट्रवादीचा एकही आमदार नाही. मात्र, छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातून आमदार सतिश चव्हाण मराठवाडा शिक्षक मतदारसंघातून आमदार विक्रम काळे यांना निवडून देण्यात नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महत्वाची आणि मोलाची कामगिरी बजावली आहे.

राष्ट्रवादीचे ग्रामिणचे जिल्हाध्यक्ष हरीहरराव भोसीकर, शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम सध्या कार्यरत आहेत. त्याचबरोबर किनवटचे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्यासह राष्ट्रवादीसह विविध विभागातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते नांदेड शहरासह तालुका ठिकाणी पक्षात कार्यरत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रा. डी. बी. जांभरूणकर म्हणाले की, आम्ही नांदेड जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते राष्ट्रवादी आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत आहोत.

Sharad Pawar, NCP News
Sharad Pawar-Satara : फोडाफोडीचं राजकारण करणाऱ्या प्रवृत्ती उलथवणार; प्रीतीसंगमावरुन पवारांचा एल्गार

राष्ट्रवादीतील काही नेते मंडळीशी संपर्क केला असता त्यांनी मोबाईल उचलला नाही त्यामुळे त्यांची भूमिका कळू शकली नाही. तर काही जण घडणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवून निर्णय घेणार असल्याचे समजते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असणारे शिवाजी वाडीकर सुरूवातीपासूनच अजित पवार यांच्या सोबत आहेत.

राष्ट्रवादी आणि अजित पवार यांच्यासोबत आपण असून यापुढेही राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या रक्ताचा थेंब न थेंब अजितदादा यांच्यासाठी यापुढेही राहणार असल्याचे वाडीकर यांनी सांगितले. माझ्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील अजितदादा सोबत राहतील असा, दावाही त्यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com