Sharad Pawar-Satara : फोडाफोडीचं राजकारण करणाऱ्या प्रवृत्ती उलथवणार; प्रीतीसंगमावरुन पवारांचा एल्गार

शरद पवार यांनी आज कराड मधील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी जाऊन आशीर्वाद घेतले.
Sharad  Pawar-Satara :
Sharad Pawar-Satara :Sarkarnama

महाराष्ट्र आणि देशात जातीय धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा फोडफोडीच्या भाजपच्या प्रवृत्तीला आपल्यातील काही लोक बळी पडले. महाराष्ट्रात उलथापलथ करण्याची भूमिका काही प्रवृत्तींनी घेतली, पण या फोडाफोडीचा त्यांना काही फायदा होणार नाही. अशा प्रवृत्तींना महाराष्ट्रातील सामान्य जनता उलथवून लावल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. (Latest Political News)

शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले आज महाराष्ट्रात आणि देशात जाती-जातीत, धर्मा-धर्मात संघर्ष कसा होईल याची काळजी घेणारा वर्ग आहे. पण महाराष्ट्र हा बंधुत्व आणि इमानदारी यांचा पुरस्कार करणारे राज्य आहे. मध्यंतरीच्या काळात महाराष्ट्रातीस अमरावती, कोल्हापूर, धुळे यांसारख्या ठिकाणी पिढ्यानपिढ्या एकत्र राहणाऱ्या समाजात वैरभावना वाढण्याचा प्रयत्न करण्यात आला. जायीत दंगली झाल्या. हे महाराष्ट्राला समजणारं नाही, पण असं चालणार नाही, अशा समाज विघातक प्रवृत्ती राज्यात वाढत चालल्या आहेत. या प्रवृत्तींच्या विरोधात लढण्याच काम आपण करत होतो. या प्रवृत्तींच्या विरोधात उभं राहण्याची गरज आहे.

Sharad  Pawar-Satara :
Prithviraj Chavan on Ajit Pawar: अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाचा शब्द...; पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट

पण राज्यात चांगलं काम करणारं सरकार उलथवून टाकण्याचं काम काही लोकांनी केलं. महाराष्ट्रातच नाही तर देशातील अनेक राज्यातील सरकारने या प्रवृत्तींनी उलथवून लावली. मध्यप्रदेश, कर्नाटक,महाराष्ट्र सारख्या राज्यांमध्ये या ना त्या कारणाने चांगली चाललेली सरकारे उलथवण्यात आली आणि जातीय दंगलींना प्रोत्साहन देणारी सरकारे इथे स्थापन झाली. चांगली चाललेली सरकारे पाडण्याचा प्रयत्न अजूनही सुरुच आहे. दिल्ली, पंजाब, उत्तराखंड, हिमाचलमध्ये हेच काम सुरु आहे.

देशात चुकीच्या प्रवृत्ती लोकांवर लादल्या जात आहेत. देशातील लोकशाहीलाच धक्का देण्याचा प्रयत्न या प्रवृत्ती करत आहेत. आज महाराष्ट्रात आणि देशात जाती-जातीत, धर्मा-धर्मात संघर्ष कसा होईल याची काळजी घेणारा वर्ग आहे. अशा फोडफोडीच्या भाजपच्या प्रवृत्तीला आपल्यातील काही लोक बळी पडले. ठीक आहे, एखादी व्यक्ती, एखादा समूह बळी पडला असेल पण, शाहु, फुले आंबेडकर, यंशवंतराव चव्हाण यांच्या महाराष्ट्रातला सामान्य माणूस एकवेळ उपाशी राहिलं पण महाराष्ट्रातील ही सामुहिक शक्ती मजबूत केल्याशिवाय राहणार नाही, असंही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com