Nanded: "अजितदादा हे धूर्त राजकारणी आहेत आणि त्यांच्या पोटात एक आणि ओठावर एक," असे विधान भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. त्यावर राज्याचे ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. अजितदादा इतकी वर्षे राजकारणात का टिकून आहेत, याबाबत महाजनांनी कारण सांगितले.
"उपमुख्यमंत्री अजितदादा हे धूर्त राजकारणी आहेतच, पोटात एक आणि ओठावर एक हे मला माहीत नाही, परंतु दादा हे धूर्त राजकारणी आहेत म्हणून तर ते इतकी वर्षे राजकारणामध्ये टिकून आहेत," अशा शब्दांत गिरीश महाजन यांनी अजितदादांना टोमणा मारला.
"आतासुद्धा मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ते बाहेर पडले 54 पैकी जवळपास 42 आमदार त्यांच्या सोबत आहेत. त्यामुळे दादा हे धूर्त राजकारणी आहेत, याबद्दल दुमत नाही," असेही ते सांगण्यास विसरले नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा जातीचा दाखला खरा की खोटा याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. त्यावर गिरीश महाजन यांना विचारले असता ते म्हणाले, "शरद पवार यांचा दाखला खरा का खोटा हा संशोधनाचा विषय आहे, मी त्याबद्दल जास्त बोलणं संयुक्तिक वाटत नाही. परंतु त्यांचं म्हणणं आहे की हा दाखला खोटा आहे. जो मिळालेला आहे दाखल खरा की खोटा हा तपासाचा भाग आहे. तपासल्यानंतरच कळेल."
शरद पवार यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचा दावा सध्या सोशल मीडियावर केला जात आहे. हा व्हायरल होणारा दाखला खरा आहे की खोटा? असा सवाल सध्या केला जात आहे. मात्र, हा व्हायरल होणाऱ्या दाखल्याचा दावा सुप्रिया सुळे यांनी खोटा ठरवला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.