Uddhav Thackeray Mumbra Visit: मुंब्य्रात हायहोल्टेज ड्रामा; उद्धव ठाकरेंचा ताफा पोलिसांनी रोखला

Mumbra Shinde Vs Thackeray: मुंब्य्रात राजकारण तापलं असून, शिंदे-ठाकरे गट आमनेसामने आले आहेत.
Uddhav Thackeray Mumbra Visit
Uddhav Thackeray Mumbra VisitSarkarnama
Published on
Updated on

Thane News: ठाण्यातील मुंब्रा येथील शिवसेनेच्या शाखेवरून शिंदे गट आणि ठाकरे गट आमनेसामने आले आहेत. मुंब्रा येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेवर बुलडोझर फिरवण्यात आले. त्यामुळे मुंब्य्रात राजकारण तापलं असून, ठाकरे गटाने आक्रमक पावित्रा घेतला आहे. उद्धव ठाकरे स्वत: शनिवारी मुंब्य्रातील शाखेला भेट देण्यासाठी दाखल झाले. मात्र, या शाखेच्या ठिकाणी जाण्यापासून उद्धव ठाकरे यांना पोलिसांनी रोखलं आहे.

उद्धव ठाकरे यांचा ताफा पोलिसांनी रोखल्यामुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजी केली. तर उद्धव ठाकरे यांना शाखेच्या ठिकाणी जाण्याला शिंदे गटाने विरोध केला. त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गट आमनेसामने आले. या ठिकाणी मोठा तणाव निर्माण झाला असून, पोलिसांनी मोठा बंदोबस्त वाढवला आहे.

Uddhav Thackeray Mumbra Visit
Mumbra Shinde Vs Thackeray: मुंब्य्रात राजकारण तापलं; शिंदे-ठाकरे गट आमनेसामने, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

शिवसेनेच्या मुंब्रा येथील मध्यवर्ती शाखेवर बुलडोजर फिरवण्यात आले. त्यामुळे या शाखेवरून वाद चिघळला आहे. शांततेत आपला पाहणी दौरा करावा, आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. दोन्ही गट आमनेसामने आल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी पोलिस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

दरम्यान, शिवसेनेच्या या शाखेवरून शिंदे गट आणि ठाकरे गट समोरा-समोर आल्यामुळे मुंब्रा येथे हायहोल्टेज ड्रामा पाहायला मिळला. अखेर या शाखेस्थळी उद्धव ठाकरे यांना पोलिसांनी जाऊ दिले नाही, त्यानंतर ठाकरे यांनी तेथील परिसरात भाषण करत शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.

Edited by : Ganesh Thombare

Uddhav Thackeray Mumbra Visit
Mumbra Shinde Vs Thackeray: ठाकरेंचे बॅनर फाडणाऱ्यांच्या वाहनाचा क्रमांक आमदार आव्हाडांनी केला जाहीर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com