Rajkot Fort Incident News : राणेंच्या पोकळ धमक्या, शिवसैनिक घुसले असते तर त्यांचाच चेंदामेंदा झाला असता

Aggressive Shiv Sainiks would have taught them a lesson : आदित्य ठाकरे आणि आम्ही सगळे महाविकास आघाडीचे नेते, शिवसैनिक राजकोट किल्ल्यावर जायला निघालो तेव्हा तिथे आधीच येऊन थांबलेल्या नीलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्या फोटोग्राॅफरला धक्का दिला. त्यामुळे शिवसैनिक चिडले आणि त्यांनी कोंबडी चोर, कोंबडी चोर अशा घोषणा द्यायला सुरवात केली.
Shivsena Leader Ambadas Danve
Shivsena Leader Ambadas DanveSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT Political News : राजकोट किल्ल्यावर काल झालेला राडा याची सुरवात मुळात राणेंचे पुत्र निलेश राणे यांच्यामुळे झाली. आम्ही किल्ल्यावर जाण्यासाठी रितसर परवानगी, वेळ जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षकांकडून घेतली होती. त्यामुळे त्याचवेळी तिथे नारायण राणे, नीलेश राणे व त्यांच्या समर्थकांना यायला परवानगी कशी दिली? हा खरा प्रश्न आहे. राहिला प्रश्न नारायण राणे यांनी दिलेल्या घरात घुसून मारून टाकण्याच्या धमकीचा, तर या पोकळ धमक्या आहेत.

तेव्हा परिस्थिती अशी होती, की आमच्या मोर्चामुळे किल्ल्यापासून दोन किलोमीटर अंतरवर हजार शिवसैनिक जमा झालेले होते. तर इकडे किल्ल्यामध्ये राणे आणि शंभर एक त्यांचे समर्थक. जर मोर्चासाठी जमलेले शिवसैनिक किल्ल्यात घुसले असते तरी राणे आणि त्यांच्या समर्थकांचाच चेंदामेंदा झाला असता, अशा शब्दात शिवसेना नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी राणे व त्यांच्या समर्थकांना सुनावले.

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या घटनेचा निषेध आणि प्रत्यक्ष स्थळाला भेट देण्यासाठी काल आदित्य ठाकरे, जयंत पाटील, अंबादास दानवे, विनायक राऊत, भास्कर जाधव यांच्यासह शिवसैनिक व महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते सकाळी राजकोट किल्ल्यावर गेले होते. तिथे आधीच उपस्थीत असलेल्या नीलेश राणे व त्यांच्या समर्थकांनी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला.

Shivsena Leader Ambadas Danve
Rajkot Fort Rada : राणे अन् ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा! आदित्यही चिडले, म्हणाले; मला ते घाबरतात, कारण...

यातून ठाकरे आणि राणे समर्थक ऐकमेकांना भिडले आणि किल्ल्यावर एक ते दीड तास प्रचंड राडा झाला. अंबादास दानवे यावेळी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यासोबत होते. कालच्या या राड्या संदर्भात दानवे यांनी `सरकारनामा` प्रतिनिधीशी बोलतांना काय घडले? याची इत्यंभूत माहिती दिली. आदित्य ठाकरे आणि आम्ही सगळे महाविकास आघाडीचे नेते, शिवसैनिक राजकोट किल्ल्यावर जायला निघालो तेव्हा तिथे आधीच येऊन थांबलेल्या नीलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्या फोटोग्राॅफरला धक्का दिला.

त्यामुळे शिवसैनिक चिडले आणि त्यांनी कोंबडी चोर, कोंबडी चोर अशा घोषणा द्यायला सुरवात केली. तिकडून राणे समर्थकांनी घोषणा दिल्याने वातावरण तापले. पोलिसांनी आम्हाला दुसऱ्या बाजूने नेतो, असे सांगितले पण आम्ही लपून छपून जाणार नाही, अशी भूमिका घेतली. नीलेश राणे आणि त्यांच्या समर्थकांचा गोंधळ सुरू असतांना आम्ही संयमाची भूमिका घेतली. आम्ही तिथेच थांबून होतो, पोलिसांनी राणे समर्थकांना बाजूला नेत आम्हाला मार्ग करून दिला आणि मग आम्ही किल्ल्याच्या पायऱ्यावर ठिय्या दिला.

Shivsena Leader Ambadas Danve
Aaditya Thackeray VS Narayan Rane : राणे-ठाकरे समर्थक भिडताच, उद्धव ठाकरेंनी कोणाला केला फोन...

दुसरीकडे नीलेश राणे आणि त्यांची पिलावळ गोंधळ घालत होत. मग आम्ही आक्रमक पावित्रा घेत आधी यांना बाहेर काढा अशी भूमिका घेत पायऱ्यावर ठाण मांडून बसलो. नंतर नारायण राणे किल्ल्यावर आले, ते आधी शांत उभे होते. पण शुगर असल्याने त्यांचाही तोल सुटला आणि नीलेश राणे यांच्यासोबत त्यांनीही राड्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. एक ते दीड तास हा गोंधळ किल्ल्यावर सुरू होता. राणे यांच्या दादागिरीला शिवसैनिकांनी अजिबात दाद दिली नाही.

स्वतः आदित्य ठाकरे यांनी घोषणाबाजी करणाऱ्या नीलेश राणे, त्यांचे वडील खासदार नारायण राणे यांना जी खुन्नस दिली ती पाहून यांना ठाकरे का म्हटले जाते? याची प्रचिती आली. शांत, संयमी आदित्य ठाकरे आक्रमक झाल्याचे मी पहिल्यांदा बघितले. आदित्य ठाकरे यांनी संयम राखला म्हणून प्रकरण जास्त चिघळले नाही, अन्यथा राजकोट किल्ल्यावर काल अघटीत घडले असते.

Shivsena Leader Ambadas Danve
Aditya Thackeray : "श्रावण आहे नाहीतर..." मालवणमधील राड्यानंतर पावसात भिजत आदित्य ठाकरेंचं धडाकेबाज भाषण, राणेंसह भाजपवर हल्लाबोल

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ घटनास्थळापासून दोन किलोमीटर अंतरावर आमचा मोर्चा होता. या मोर्चासाठी शिवसैनिक, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने जमले होते. हे शिवसैनिक राजकोट किल्ल्यावर आले असते तर शे-दीडशेच्या संख्येत असलेल्या राणे व त्यांच्या समर्थकांचा चेंदामेंदा झाला असता, असा इशारा अंबादास दानवे यांनी दिला. नारायणे राणे यांच्या पोकळ धमक्यांना आम्ही आधीही भीक घालत नव्हतो, आताही घालत नाही, असेही दानवे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com