Narendra Modi News: मोदींना दिवंगत मुंडेंची आठवण ; म्हणाले, 'उनसे दिल का रिश्ता था...!

Beed Lok Sabha Constituency 2024: मराठवाड्याच्याच्या विकासाची जबाबदारी एनडीएची आहे. राष्ट्रीय महामार्ग, बीड रेल्वे मार्ग विकासाच्या दिशेने पुढे जात आहे. भाजप व एनडीए ने मुंडेचे स्वप्न पूर्ण करावयाचे आहे. त्यासाठी पंकजा मुंडे यांना विजयी करा,' असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केली.
Beed Lok Sabha Constituency 2024
Beed Lok Sabha Constituency 2024Sarkarnama

दत्ता देशमुख

Beed News: परळीच्या वैद्यनाथाला नमन, हर हर महादेव, संत भगवानबाबा, संत नारायण, योगेश्वरी देवीला नमन अशी भाषणाची सुरुवात करत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या (Gopinath Munde) आठवणींना उजाळा दिला. मुंडेजींके साथ दिल का रिश्ता, उनकी याद आती है और कमी महसुस होती है.

उनका अनुभव मुझसे ज्यादा था. जब मै 2014 मे देश की सेवा की लिये निकला तब ऊन जैसे लोगो को मैने साथ लिया था," असे मोदी म्हणाले. प्रत्येकवेळी दिवंगत मुंडे विकासावर चर्चा करत अशी आठवण त्यांनी काढली.

Beed Lok Sabha Constituency 2024
Baramati Lok Sabha 2024: 'मेरे पास मेरी माँ है... म्हणणाऱ्या अजितदादांचे सख्ख्या भावानेच उपटले कान; ८६ वर्षांच्या आईला राजकारणात...

अंबाजोगाई येथे भाजपच्या लोकसभा उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचार सभेत नरेंद्र मोदी यांनी अरुण जेटली, सुषमा स्वराज, मनोहर पर्रीकर असे नेते सोडून गेले, त्यांची कमी नेहमी भासते, अशी खंत मोदींनी व्यक्त केली.पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांनी अंबाजोगाईत कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर सभा घेतली.

साठ वर्षात ठप्प असलेली मराठवाडा सिंचन परियोजना पुढे नेत आहोत. यात २३ प्रकल्पांची निवड केली असून १० पूर्ण झाल्याचा दावा नरेंद्र मोदींनी केला. शेतकऱ्यांच्या मेहनतीची आपल्याला जाण असल्यानेच आपण पिक विमा लागू केली.

आता राज्य सरकार देखील किसान सन्मान निधी देत आहे. मराठवाड्याच्याच्या विकासाची जबाबदारी एनडीएची आहे. राष्ट्रीय महामार्ग, बीड रेल्वे मार्ग विकासाच्या दिशेने पुढे जात आहे. भाजप व एनडीए ने मुंडेचे स्वप्न पूर्ण करावयाचे आहे. त्यासाठी पंकजा मुंडे यांना विजयी करा,' असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केली.

पंकजा मुंडे यांनी शौर्याचे प्रतिक असलेला दांडपट्टा मोदींचा देऊन फेटा बांधून तसेच घोंगडी व काठी देऊन स्वागत केले. त्यांना योगेश्वरीची प्रतिमा भेट देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री धनंजय मुंडे, खासदार डॉ.प्रितम मुंडे, आमदार नमिता मुंदडा, आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश सोळंके, आमदार लक्ष्मण पवार, आमदार बाळासाहेब आजबे, आमदार विक्रम काळे, अमरसिंह पंडित, भिमराव धोंडे, रमेशराव आडसकर, राजेश्वर चव्हाण, राजेंद्र मस्के, सचिन मुळुक, अक्षय मुंदडा आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com