Baramati Lok Sabha 2024: 'मेरे पास मेरी माँ है... म्हणणाऱ्या अजितदादांचे सख्ख्या भावानेच उपटले कान; ८६ वर्षांच्या आईला राजकारणात...

Maharashtra Election Voting LIVE Updates: "आमच्या समोरच्या लोकांनी कुटुंब माझ्या विरोधात असे दाखवण्याचा प्रयत्न केला. आमच्या कुटुंबात सगळ्यात ज्येष्ठ माझे वडील अनंतराव पवार होते. आज माझी आई माझ्या बरोबर आहे. याची नोंद सगळ्यांनी घ्यावी,"
Baramati Lok Sabha 2024
Baramati Lok Sabha 2024Sarkarnama
Published on
Updated on

Baramati: बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज काटेवाडी येथे मतदानाचा (Baramati Lok Sabha Election 2024) अधिकार बजावला. यावेळी त्यांच्यासोबत आई आशाताई पवार होत्या.

पवार कुटुंबियांनी अजित पवार यांना एकटं वाटल्याचा आरोप केला जात असताना अजितदादांनी काटेवाडी मतदानकेंद्रावर जाण्यापूर्वी "मेरे पास मेरी मॉ हे,' असे म्हणत विरोधक आणि कुटुंबियांनी उत्तर दिले आहे. त्यावर त्यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार (Srinivas Pawar) यांनी अजितदादांना (Ajit Pawar) पुन्हा फटकारले. अजितदादांचे विधान 'दीवार'सिनेमातील संवादाशी जोडलं जात आहे.

"आमच्या समोरच्या लोकांनी कुटुंब माझ्या विरोधात असे दाखवण्याचा प्रयत्न केला. आमच्या कुटुंबात सगळ्यात ज्येष्ठ माझे वडील अनंतराव पवार होते. आज माझी आई माझ्या बरोबर आहे. याची नोंद सगळ्यांनी घ्यावी," असे अजितदादांनी ठणकावून सांगितले.

Baramati Lok Sabha 2024
Lok Sabha Election 2024 Voting LIVE: पवार कुटुंबाने एकटं पाडलं? अजित पवार यांचा 'दीवार टच'; 'मेरे पास मेरी माँ है..!

प्रचाराच्या सुरवातीच्या टप्प्यात अजित पवार यांनी कुटुंबात मला एकटे पाडायचा प्रयत्न केला जात आहे, ही राजकीय लढाई अशी कौटुंबिक पातळीवर येईल, असे मला कधी वाटले नव्हते, असे अजित पवार म्हणाले होते. "अजित पवारांनी ८६ वर्षांच्या आईला राजकारणात ओढायला नको होतं” असं श्रीनिवास पवार म्हणाले. ती आई आहे, मुलासोबत मतदानाला जाणारच, असे श्रीनिवास पवार यांनी स्पष्ट केले.

मी त्याचा सख्खा भाऊ आहे. मला त्याची भूमिका पटली नाही, म्हणून मी वेगळा झालो. मी उघड भूमिका घेतली आहे. चांगली गोष्ट आहे की आई त्याच्या बरोबर आहे. मोदींच्या आई बद्दल दादा काही दिवसांपूर्वी बोलला होता. तोच प्रकार दादा तिकडे जाऊन शिकला असेल, असा टोला श्रीनिवास पवारांनी अजितदादांना लगावला. अजित पवार यांच्या पत्नी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात आहे.

अजित पवार, महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत मतदान केले.अजित पवार यांची आई आशाताई यांनीही काटेवाडीत मतदानाचा अधिकार बजावला. यंदा शरद पवार त्यांनी आपले नाव मुंबईतून कमी करून घेत बारामती विधानसभा क्षेत्रात माळेगाव येथील गोविंदबागेच्या पत्त्यावर नोंदवले आहे.

बारामतीत यंदा नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. संपुर्ण पवार कुटुंबियांनी मतदानाचा अधिकार बजावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com