
Mumbai News : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच मेव्हणा विकास खेडकर याच्यासह नऊ जणांना मराठवाडा पोलिसांनी तडापारीची कारवाई केली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मेव्हण्यावर कारवाई झाली म्हणून मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. त्यावर बोलताना छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना, कायद्यासमोर सर्वच सारखेच आहे, त्यामुळे चुकीच्या कामावर कडक कारवाई होणारच, असे म्हटले आहे.
छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यात आरक्षणाच्या मुद्यावर संघर्ष आहे. मनोज जरांगे यांनी ओबीसीमधून मराठा (Maratha) समाजाला आरक्षण मागितले आहे. ते त्यावर आजही ठाम आहे. जरांगे आता मागणीसाठी मुंबईत आंदोलन सुरू करणार आहे. ओबीसींचे आरक्षणाला संरक्षण मिळावे, यासाठी छगन भुजबळ मैदानात आहे. यातून दोघांमधील संघर्ष कायम धुसमत असतो. विधानसभा निवडणुकीपूर्वी हा संघर्ष टोकाला गेला होता.
छगन भुजबळ आणि मनोज जरांगे एकमेकांवर बोलण्याची कोणतीही संधी सोडत नाही. आता वाळू चोरीत मनोज जरांगे यांचा मेव्हाण विकास खेडकर याच्यासह नऊ जणांना मराठवाडा पोलिसांनी तडीपार केले आहे. त्यावर जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना निशाणा साधताना, जहरी टीका केला. माझा आवाज दाबण्यासाठी हा प्रकार सुरू आहे. पण समाजासाठी आंदोलनाला बसलो आहे. तिथं आईवडिलांसह कोणत्याच नातेवाईकांना स्थान नाही, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली.
या कारवाईवर छगन भुजबळ म्हणाले, "मी ऐकलं आहे. काय आपेक्षा आहे हे मला माहीत नाही. मात्र फडणवीसांनी त्यांना विचारावं, कोणा-कोणाला पकडलं पाहिजे ते! फडणवीस काय कोणाला आर्डर देत नाहीत. पोलिस करतात, काय करायचे ते डायरेक्ट! प्रत्येक गोष्टी गृहमंत्र्यांना विचारली जात नाही". स्थानिक पातळीवर जे-जे दोषी असतात, त्यावर पोलिस कारवाई करतात. ज्यावेळी आपण म्हणतो, कडक कारवाई करा, त्यावेळी अशीच ही कारवाई होते. कठीण समस्या आहे, असे म्हणताना छगन भुजबळ हसले.
परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. याप्रकरणी पाच पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. यावर भाजप आमदार सुरेश धस यांनी सूर्यवंशी कुटुंबियांना आता त्यांना मोकळ्या मनाने माफ करावे, अशी भूमिका घेतली. त्यावर छगन भुजबळ चांगलेच संतापले.
'ते अतिशय चुकीचे आहे. देशमुख असतील, सूर्यवंशी असतील, लातूरमधील एक धनगर समाजाच्या युवकाचा मृत्यू असो यात जो कोणी दोषी असेल, त्या सर्वांना कडक शिक्षा झाली पाहिजे. मराठा, दलित, धनगर समाजाचा आहे, असे म्हणून मारलेलं चालतय, असे होत नाही. संविधानाचा देश आहे. सर्वांचा न्याय झाला आहे. एकदा ही सुरवात झाली सगळ्याच केससमध्ये मागणी होईल. मात्र न्यायालय हे ऐकणार आहे का? कायदा कायद्याच्यादृष्टीने काम करेल. सगळ्यासारखा न्याय मिळाला पाहिजे. मराठा, दलित, धनगर समाजाचा असेल, त्याला न्याय मिळालाच पाहिजे', असे छगन भुजबळ यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.