औरंगाबादच्या नामांतरावरून शरद पवार नाराज; थेट उद्धव ठाकरेंकडं दाखवलं बोट

ठाकरे सरकारने मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीत नामांतराचा निर्णय घेतला आहे.
Sharad Pawar Latest Marathi News, Uddhav Thackeray Latest Marathi News
Sharad Pawar Latest Marathi News, Uddhav Thackeray Latest Marathi NewsSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : ठाकरे सरकारने शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबादचे संभाजीनगर व धाराशीव असं नामांतर करण्याचा निर्णय घेतला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. किमान समान कार्यक्रमामध्ये हा मुद्दा नव्हता. हा निर्णय घेतल्यानंतर मला समजले. पण एकदा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्यानंतर तो अंतिम असतो. खऱ्या समस्यांकडे लक्ष द्यायला हवे, असं सांगत पवारांनी शिवसेनाप्रमुख व तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे बोट दाखवलं. (Sharad Pawar Latest News)

औरंगाबादमध्ये माध्यमांशी बोलताना पवार यांनी नामांतराच्या मुद्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, किमान समान कार्यक्रम तयार केला होता, त्यामध्ये हा मुद्दा नव्हता. त्यासंबंधीचा निर्णय मंत्रिमंडलाच्या शेवटच्या बैठकीत घेतला त्यावेळी आमच्याशी सुसंवाद नव्हता. निर्णय झाल्यानंतर माझ्या लक्षात आले. आम्ही ठरवलेल्या कार्यक्रमाचा भाग नव्हता.

Sharad Pawar Latest Marathi News, Uddhav Thackeray Latest Marathi News
Shiv Sena Latest News : खासदार गावितांच्या पत्राने शिवसेनेत फुटीची ठिणगी

मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांचा निर्णय हा अंतिम असतो. तिथे मत व्यक्त केली जातात, पण ते मुख्यमंत्र्यांवर बंधनकारक नसते. नामांतराच्या मुद्दावर काही लोकांनी मतं व्यक्त केली. पण हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आणि जाहीर केला. तो मंत्रिमंडळाचा म्हणून जाहीर केला जातो. याबाबत यत्किंचितही माहिती आम्हाला कुणाला नव्हती, असं पवारांनी स्पष्ट केलं.

शासकीय धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी चर्चा करण्याची एक पध्दत होती, त्यात ही चर्चा झाली नव्हती. औरंगाबादच्या दृष्टीने वेगळ्या गोष्टी केल्या असत्या तर औरंगाबादच्या लोकांना आनंद झाला असता. भावनेचा प्रश्न निर्माण झाला नसता तर आनंद झाला नसता. पक्ष म्हणून आम्ही निर्णय घेतला नव्हता, असंही पवार म्हणाले.

Sharad Pawar Latest Marathi News, Uddhav Thackeray Latest Marathi News
मोठी घडामोड : काँग्रेसच्या बैठकीला सात आमदारांची दांडी, काही आमदार भाजपच्या संपर्कात?

पक्षाच्या व्यासपीठावर याची चर्चा झाली, असा एकही प्रसंग नाही. माझ्या कानावरही आला नाही. पण हा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे, त्यात आम्हीही होतो. सगळे विवाद सोडून खऱ्या समस्यांकडे लक्ष द्यायला हवे होते, असं सांगत पवारांनी उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com