Shiv Sena Latest News : खासदार गावितांच्या पत्राने शिवसेनेत फुटीची ठिणगी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गावित सामील होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
Rajendra Gavit News, Palghar News,  Uddhav Thackeray News, Shivsena News
Rajendra Gavit News, Palghar News, Uddhav Thackeray News, Shivsena NewsSarkarnama
Published on
Updated on

विरार : शिवसेनेतील 40 आमदारांच्या बंडानंतर आता खासदारही बंडाच्या पवित्र्यात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. एकामागोमाग एक पत्र मातोश्रीवर धडकत आहे. आधी भावना गवळी नंतर राहुल शेवाळे आणि नंतर राजेंद्र गावित (Rajendra Gavit) यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिलं. गवळींनी शिंदे गटाचं समर्थन केलं. तर शेवाळे व गावित यांनी राष्ट्रपती पदाच्या भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंब्याची मागणी केली. (Shiv Sena Latest Marathi News)

गावित यांच्या पत्रामुळे तेही बंड करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यात शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. राष्ट्रपतीपदासाठी येत्या १८ जुलैला निवडणूक होत असून शिवसेनेने या निवडणुकीत पाठिंबा देण्याबाबत अद्याप कोणतीही भूमिका जाहिर केलेली नाही. द्रौपदी मुर्मू आदिवासी समाजातील महिला आहेत. मुर्म यांच्यामुळे आदिवासी समाजाला देशाच्या सर्वोच्च पदावर जाण्याचा बहुमान मिळणार आहे. त्यामुळे त्यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी गावीत यांनी केली आहे.

Rajendra Gavit News, Palghar News,  Uddhav Thackeray News, Shivsena News
शिवसेना अन् शिंदे गटाच्या भांडणात आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचणार; 53 आमदारांना नोटीस

गावित हे शिवसेनेचे खासदार असले तरी या अगोदर ते काँग्रेस मध्ये राज्यात मंत्री होते. नंतर ते भाजपमध्ये गेले. तर लोकसभा निवडणुकीत पालघरची जागा शिवसेनेने भाजपकडून घेतल्यानंतर गावित यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच शिवसेनेत प्रवेश घेत लोकसभा निवडणुक लढवली होती. त्याआधीच्या पोटनिवडणुकीत गावित भाजपच्या तिकीटावर शिवसेनेचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांचा पराभव करून विजयी झाले होते.

गावित यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही त्यांचे अतिशय निकटचे संबंध आहेत. पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांच्या पुत्राचा पराभव झाल्यापासून खासदार गावित जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांवर नाराज आहेत. आपल्या पुत्राच्या पराभवाला जिल्हाप्रमुख राजेश शाह यांच्यासह काही पदाधिकारी जबाबदार असल्याची तक्रारही त्यांनी उध्दव ठाकरे यांच्याकडे केली होती.

Rajendra Gavit News, Palghar News,  Uddhav Thackeray News, Shivsena News
मुंबईत परतल्यावर दोघे चर्चा करु पण आषाढीनंतर मंत्रिमंडळ विस्तार निश्चित : एकनाथ शिंदे

खासदार गावीतांचे आता शिवसेना पदाधिकाऱ्यांशीही फारसे जिव्हाळ्याचे संबंधही राहिलेले दिसत नाहीत. त्यातच शिंदे यांनी बंड करून सत्ता मिळवल्याने पालघर जिल्ह्यातील शिवसेनेतही धुसफूस सुरु झाली आहे. शिंदे यांच्या बंडानंतर वसई आणि पालघर शहरात शिंदे गटाविरोधात आंदोलन झाले होते. त्यावेळी वसई विरार, बोईसरचे जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण आणि पालघरचे जिल्हाप्रमुख राजेश शाह गैरहजर राहिले होते. खासदार गावितांनी आंदोलनापासून दूर राहणेच पसंत केले होते.

शिवसेनेपासून दूरावलेले अनेक माजी पदाधिकारी सध्या शिंदे यांचे समर्थन करू लागले आहेत. पालघर जिल्हा परिषद, पालघर नगरपरिषद, पालघर पंचायत समितीवर शिवसेनेची सत्ता आहे. सत्तेत असलेल्या बहुतांश पदाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार तथा संपर्कप्रमुख रविंद्र फाटक यांच्याशी निकटचे संबंध होते. त्यामुळे येत्या काळात पालघर शिवसेनेत मोठे बंड होणार हे निश्चित मानले जाते. गावित यांच्या पत्राने बंडाची ठिणगी पडलेलीच आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com