Hingoli : राष्ट्रवादी-काॅंग्रेसच्या नेत्यांनी कारखाने, संस्था दिल्या, आम्हाला झुणका-भाकर, शिवभोजन थाळी..

आमचे आयुष्य फक्त जय भवानी जय, शिवाजी म्हणत वर्गणी मागण्यातच गेले. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाने सर्वसामान्य शिवसैनिक सुखावला आहे. (Mp Hemant Patil)
Mp Hemant Patil-Uddhav Thackeray News, Hingoli
Mp Hemant Patil-Uddhav Thackeray News, HingoliSarkarnama
Published on
Updated on

हिंगोली : राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेसच्या नेत्यांनी आपल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना कारखाने, संस्था, दारूची दुकाने दिली आणि आम्हाला (Shivsena) शिवसेना नेतृत्व आणि नेत्यांनी आधी झुणका भाकर आणि आता शिवभोजन थाळी देत लाचार बनवले. दहा रुपयात पाच पदार्थ थाळीत देवून काय कमावणार? अशा शब्दांत शिंदेसेनेत गेलेले हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी शिवसेनेवर टीका केली.

विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरे असतांना युतीची सत्ता आल्यानंतर १९९५ मध्ये गरीबांना एक रुपयात झुणका-भाकर देण्याची महत्वाकांक्षी योजना राज्यभरात राबवण्यात आली होती.(Hingoli) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संमती दिलेल्या योजनेवर देखील खासदार हेमंत पाटील यांनी टीका केली आहे. जय भवानी, जय शिवाजी म्हणत आम्हाला वर्गणी गोळा करायला लावले जात होते, असेही पाटील म्हणाले.

मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर ५ आॅक्टोबरला होणार आहे. या मेळाव्याच्या पुर्वतयारीसाठी हिंगोलीत खासदार हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत पाटील यांनी शिवसेनेचे नेते आणि पक्ष नेतृत्वावर नाव न घेता टीका केली.

पाटील म्हणाले, शिवसेना नेते व नेतृत्वाने शिवसैनिकाला कायम लाचार बनविण्याचे काम केले. १९९५ मध्ये शिवसेनेची सत्ता आली तेव्हा एक रुपयात झुणका भाकर आणि आता दहा रुपयात शिवभोजन थाळी दिली. यातून कार्यकर्त्याने आणि पदाधिकाऱ्याने काय कमवायचे? राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेतृत्वाने मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांना साखर कारखाने, सहकारी संस्था दिल्या.

Mp Hemant Patil-Uddhav Thackeray News, Hingoli
Beed : पहिल्या युती सरकारमध्येच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं..

त्यामुळे विरोधक बलाढ्य झाले आणि त्यांच्याकडून शिवसैनिकांचे खच्चीकरण होत गेले. आमचे आयुष्य फक्त जय भवानी जय, शिवाजी म्हणत वर्गणी मागण्यातच गेले. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाने सर्वसामान्य शिवसैनिक सुखावला आहे. बहुजनांचा मुख्यमंत्री झाल्याचा सगळ्यांना आनंद वाटतोय, असेही पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com