Shivraj Patil Chakurkar: लातूर जिल्हा रुग्णालयाला शिवराज पाटील चाकूरकरांचे नाव द्या; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

Latur Civil Hospital News: लातूर जिल्हा रुग्णालय मंजुरीचे श्रेय कोणाचे? यावरून जिल्ह्यातील आमदार अमित देशमुख, संभाजी पाटील निलंगेकर, अभिमन्यू पवार यांच्यात स्पर्धा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ही नवी मागणी समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
Latur Civil Hospital
Latur Civil Hospital Sarkarnama
Published on
Updated on

Latur Civil Hospital News : लातूर जिल्हा रुग्णालयाच्या उभारणीसाठीचे कार्यारंभ आदेश जारी झाल्यानंतर आता या हाॅस्पिटलला दिवंगत काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे नाव द्या, अशी मागणी समोर येऊ लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते तथा माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन त्यांना या मागणीचे निवेदन दिले.

लातूर जिल्हा रुग्णालय मंजुरीचे श्रेय कोणाचे? यावरून जिल्ह्यातील आमदार अमित देशमुख, संभाजी पाटील निलंगेकर, अभिमन्यू पवार यांच्यात स्पर्धा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ही नवी मागणी समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. लातूर येथे प्रस्तावित नवीन जिल्हा रुग्णालयाची लातूरकरांना अनेक वर्षापासून प्रतीक्षा होती.

याबाबत लातूरकर, लोकप्रतिनिधी आणि विशेषतः माझं लातूर या व्यासपीठाच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. महायुती शासनाने यासाठी निधी उपलब्ध करून देत मुर्त स्वरूप देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच रुग्णालयाचा भूमिपूजन सोहळा दिनांक 18 एप्रिल रोजी संपन्न होणार आहे. यापार्श्वभूमीवर विक्रांत गोजमगुंडे यांनी शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन नवीन जिल्हा रुग्णालयास दिवंगत शिवराज पाटील चाकूरकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी केली.

यासंदर्भात पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहरे. शिवराज पाटील चाकूरकर यांचे लातूर, महाराष्ट्र तसेच देशाच्या विकासात मोठे व मोलाचे योगदान राहिलेले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत प्रस्तावित जिल्हा रुग्णालयास त्यांचे नाव देण्यात आल्यास येणाऱ्या पिढ्यांना त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळेल व त्यांच्या योगदानाची जाणीव कायम राहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Latur Civil Hospital
Sahar Shaikh News: 'कैसे हराया' फेम 'एमआयएम'च्या सहर शेखचं नगरसेवकपद धोक्यात; 'नॉट रिचेबल' झालेले वडील दोन दिवसांत करणार मोठा धमाका

याबाबत मनपाच्या दिनांक 10 मार्च रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत देखील मागणी करून तसा शिफारस प्रस्ताव शासनास देण्याबाबत सूचना मांडली होती. पालकमंत्र्यांनी या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देऊन भूमिपूजन सोहळ्यात याबाबतची घोषणा करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

100 खाटांच्या जिल्हा रुग्णालयाला 17 जानेवारी 2013 रोजी मंजुरी मिळाली. 2019 मध्ये आघाडीचे सरकार असताना वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या लातूर येथील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या परिसरातील 10 एकर जागा या जिल्हा रुग्णालयासाठी निश्चित करण्यात आली.

Latur Civil Hospital
Rahul Gandhi: राहुल गांधींच्या अडचणीत वाढ! पुन्हा खासदारकी धोक्यात? दुहेरी नागरिकत्व प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

या जागेसाठी विद्यापीठाकडून आणि कृषी विभागाकडून मोबदल्याची मागणी झाली तेव्हा शासनाच्या एका खात्याकडून दुसर्‍या खात्याकडे जागा हस्तांतरित होत असताना मोबदला कसा द्यायचा? यात हा प्रकल्प पुन्हा काही वर्ष रखडला होता.

आता 2026 मध्ये लातूर शहर आणि जिल्ह्याची लोकसंख्या अनेक पटीने वाढली आहे. त्यामुळे आज या रुग्णालय उभारणीस सुरुवात होत असेल तर सध्याची लोकसंख्या गृहीत धरून हे जिल्हा रुग्णालय 100 ऐवजी किमान 400 खाटांच्या क्षमतेचे उभारण्यात यावे, अशी नवी मागणीही शासनाकडे नोंदवण्यात आली आहे. नव्या जिल्हा रुग्णालयासाठी 25.70 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com