Meghana Bordikar viral post case : अजितदादांचा 'विजय'चा पुतण्या अडचणीत; मंत्री बोर्डीकरांच्या नावानं आक्षेपार्ह पोस्ट भोवली...

Relative of NCP Vijay Bhamble Detained for Offensive Post Against BJP Minister Meghana Bordikar : परभणी भाजप मंत्री मेघना बोर्डीकर यांच्या नावानं समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याप्रकरणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा नातेवाईक अडचणीत आला आहे.
Meghana Bordikar viral post case
Meghana Bordikar viral post caseSarkarnama
Published on
Updated on

BJP vs NCP social media clash : परभणीतील एका कार्यक्रमात ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याच्या विधानावरून भाजप मंत्री मेघाना बोर्डीकर या चांगल्याच अडचणी सापडल्या आहेत. या व्हिडिओमागे कोण होतं, हे सांगताना त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे स्थानिक नेते माजी आमदार विजय भांबळे यांच्याकडे अंगुलीनिर्देश केले होते.

आता मंत्री बोर्डीकर यांच्या नावाने आक्षेपार्ह पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल केल्याप्रकरणी विजय भांबळे यांचा पुतण्या पृथ्वीराज भांबळे याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानं खळबळ उडाली आहे. त्यामुळे मंत्री बोर्डीकर अन् भांबळे यांच्यातील राजकीय द्वंदानं चांगलाच जोर पकडला आहे.

भाजप (BJP) मंत्री मेघना बोर्डीकर यांच्या नावाने आक्षेपार्ह पोस्ट समाज माध्यमांवर टाकण्यात आली होती. याबाबत पोलिसाकंडे तक्रार झाली. पोलिसांनी शोध घेतल्यानंतर मंत्री बोर्डीकर यांच्या नावानं पोस्ट टाकणाऱ्याचा खरं रहस्य समोर आलं. ही पोस्ट टाकण्यासाठी दुसऱ्याच्या नावाने समाज माध्यमांवर खातं सुरू होतं, हे देखील पोलिसांच्या चौकशीत समोर आलं आहे.

मंत्री बोर्डीकर यांच्या नावानं आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार विजय भांबळे यांचा पुतण्या पृथ्वीराज भांबळे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. पृथ्वीराज भांबळेकडे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याला नोटीस बजावून सोडण्यात आलं आहे.

Meghana Bordikar viral post case
Sujay Vikhe Vs Balasaheb Thorat : सुजयदादांनी थोरातसाहेबांना 'जोरात' डिवचलं; आमदार खताळांना 'यशोधन'वर काय पोचवायला सांगितलं

या आक्षेपार्ह पोस्ट प्रकराणामुळे पुन्हा एकदा जिंतूरमध्ये भांबळे-बोर्डीकर, असा राजकीय सामना रंगला होता. दुसरीकडे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिंतूरमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणात पृथ्वीराज भांबळे याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने अप्पर पोलिस अधीक्षकांना भेट घेऊन केल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी दिली.

Meghana Bordikar viral post case
Devayani Farande Politics : आमदार फरांदे संतप्त; महापालिकेनं मलमपट्टी थांबवावी अन् रस्त्यावर उतरावं!

दरम्यान, ग्रामसेवकाला भर कार्यक्रमात कानाखाली मारण्याची धमकी देण्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यामागे कोण आहे, याविषयी मंत्री बोर्डीकर यांनी दोन दिवसापूर्वी अंगुलीनिर्देश केले होते. अजितदादांकडे असलेला अन् रोहित पवार यांचे जुने मित्र असल्याचा उल्लेख मंत्री बोर्डीकरांनी केला होता.

मंत्री बोर्डीकर अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर इथं दौऱ्यावर असताना, माजी आमदार विजय भांबळे यांच्याविषयी सूचक हे भाष्य होते. तेव्हापासून बोर्डीकर-भांबळे यांच्यातील राजकीय तणाव वाढणार असल्याचे संकेत मिळाले होते. भाजप मंत्री बोर्डीकर यांना राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यानं टार्गेट केल्यानं महायुतीवर त्याचा आगामी काळात परिणाम होणार असल्याचे संकेत आहे.

महायुतीमधील नेते असे एकमेकांना टार्गेट करत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर या तक्रारींना वाढत्या ओघामुळे त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. आगामी काळात या तक्रारींमुळे महायुतीवर देखील गंभीर परिणाम होण्याची शक्यता अधिक आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com