Sujay Vikhe Vs Balasaheb Thorat : सुजयदादांनी थोरातसाहेबांना 'जोरात' डिवचलं; आमदार खताळांना 'यशोधन'वर काय पोचवायला सांगितलं

Sujay Vikhe Criticizes Ahilyanagar Balasaheb Thorat at Bojapur Charai Jalpoojan Ceremony in Sangamner : संगमनेर भोजापूर चारीचा नान्नज दुमाला इथल्या जलपूजन सोहळ्यात भाजप माजी खासदार सुजय विखे यांनी काँग्रेस बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली.
Sujay Vikhe Vs Balasaheb Thorat
Sujay Vikhe Vs Balasaheb ThoratSarkarnama
Published on
Updated on

Sangamner political news : संगमनेरच्या भोजापूर चारीच्या पाण्यावरून राजकारण चांगलच तापलं आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला. थोरात यांनी देखील मंत्री विखे पाटलांना जशास तसं उत्तर दिलं.

विखे पाटील अन् थोरातांमध्ये पाण्यावरून राजकारण तापलं असतानाच, मंत्री विखे पाटलांचं पुत्र माजी खासदार सुजय विखे पाटलांनी उडी घेतली आहे. आमदार अमोल खताळ यांना विधानसभेतील पाण्यावरची भाषण बाळासाहेब थोरातांच्या 'यशोधन'वर पोचण्यास सांगून, थोरातांना सुजय विखे पाटलांनी जोरदार डिवचलं आहे.

संगमनेरच्या (Sangamner) भोजापूर चारीचा जलपूजन सोहळा नान्नज दुमाला इथं माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत झाला. आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम, माजी तालुकाध्यक्ष भीमराव चतर, शिवसेनेचे विठ्ठलराव घोरपडे, संदीप देशमुख यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) म्हणाले, "40 वर्ष सत्तेत राहून पाणी न आणणाऱ्यांना जनतेनं बाजूला केलं आणि महायुतीवर विश्वास ठेवला. आज त्या विश्वासाला उत्तर दिलं जात आहे. मी यापूर्वी शब्द दिला होता की, ज्या दिवशी पाणी पोचेल, त्या दिवशीच मी इथं सभा घेईन, आज तो दिवस आहे. ही केवळ सभा नाही, तर जनतेच्या आश्वासनपूर्तीची साक्ष आहे".

Sujay Vikhe Vs Balasaheb Thorat
Satyajeet Tambe Sangamner : सत्यजीत तांबेंचा कामाचा धडाका; ज्यांनी समजायचं त्यांनी समजून घ्या!

'आमदार अमोल खताळ यांनी हा संपूर्ण भाग पाणीदार करण्यासाठी जिद्दीने पाठपुरावा केला. मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून हा भाग आता जलसमृद्ध होतोय. त्यांच्या खांद्यावर जबाबदारी देण्यात आली आणि त्यांनी ती यशस्वीपणे पार पाडली याचा अभिमान आहे', असेही विखे पाटील यांनी म्हटलं.

Sujay Vikhe Vs Balasaheb Thorat
IAS Tukaram Mundhe: सिर्फ नाम ही काफी है..! तुकाराम मुंढे; 20 वर्षांतील 24 वी बदली; नेत्यांना ते का आवडत नाहीत?

विखे पाटलांनी भाषणाच्या शेवटी, आमदार खाताळ याच्या पत्नी नीलम यांना विनंती केली. ते म्हणाले, "ताई आमदार अमोलभाऊंना सांगावे, की आम्ही विधानसभेत पाण्याविषयी विचारलेले प्रश्न अजूनही उत्तराशिवाय आहेत. ती भाषणे घेऊन 'यशोधन' कार्यालयात पोचवावीत, जेणेकरून आम्हाला त्यांची उत्तरं मिळतील".

'ही जलक्रांती केवळ विकासाचे प्रतीक नाही, तर सत्तांतरानंतर जनतेच्या अपेक्षांना मिळालेलं ठोस उत्तर आहे. महायुतीच्या नेतृत्वात संगमनेर तालुका जलस्वावलंबनाच्या दिशेने पुढे जात आहे. पाणी, रस्ते, शेती, शिक्षण, आरोग्य या साऱ्या क्षेत्रांतील कार्यक्षम नेतृत्वच खरा विकास घडवू शकते', असा ठाम विश्वास विखे पाटलांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com