Beed Political News : भाजपा कार्यकर्ते अशोक शेजुळ यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. यानंतर बीड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. आता या प्रकरणी महत्वाची अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांच्यासह त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी अशोक शेजुळ यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीनुसार आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके(Prakash Solanke) , त्यांच्या पत्नी मंगला सोळंके आणि उद्योजक रामेश्वर टवाणी यांच्यासह चार ते पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपा कार्यकर्ते अशोक शेजुळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या विविध संस्थांमधील अनियमिततेबाबत तक्रारी केल्या होत्या. याच कारणास्तव शेजुळ यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप करत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपा कार्यकर्ते अशोक शेजुळ यांनी सुंदरराव सोळंके टेक्सटाईल पार्क, माजलगाव सहकारी साखर कारखान्याची माहिती अधिकाराअंतर्गत माहिती मागितली होती. या पार्श्वभुमीवर त्यांनी संभाजीनगर हायकोर्टात याचिका दाखल केली होती. दरम्यान, मंगळवारी धुलिवंदनाच्या दिवशी शेजुळ यांच्यावर अज्ञात चार ते पाच जणांनी हल्ला करत तू लय प्रकाश सोळंकेंच्या तक्रारी करतो का ? असे म्हणत लोखंडी रॉडने मारहाण करत गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या हल्ल्यात शेजुळ यांच्या दोन्ही पायांना, दोन्ही हातांना, कंबरेत दुखापत झाली आहे. याप्रकरणी श्री. शेजुळ यांच्या फिर्यादीवरून आमदार प्रकाश सोळंके, त्यांच्या पत्नी मंगला सोळंके, टेक्स्टाईल पार्कचे अध्यक्ष रामेश्वर टवाणी यांच्यासह पाच ते सहा जणांविरुद्ध माजलगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.